पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  कै० जावजी दादाजी चौधरी.  ६५

_________________________________________________________

उंच जात जावें तसतशी साधारण लोकांची दृष्टि फिरते व प्रसंगी घेरीही येते. जर

संख्यादृष्टीने पाहिले तर हा मजला थोडे लोक पाहतात व या कारागिरांचे कुशल-

कर्माचा रसास्वाद घेतात. तथापि सहृदय, मर्मज्ञ व होतकरू अशी मंडळी येथें जाईल

व जाते अशी अपेक्षा असल्या कारणानें तेथील कारागिरांनी आपलें बुद्धिसर्वस्व या

ठिकाणी दाखविलें आहे. याचप्रमाणे वाढत्या प्रमाणावर वरील भाग तयार झाले

आहेत व होत आहेत. इतर पुष्कळ कुशल कारागिरांचा नामनिर्देश करणे राहिलें

आहे, पण स्थलाभाव आड येतो. पण इतकें झाले तरी एका अष्टावधानी कारा-

गिराचा जावजींनी संग्रह केला आहे ती गोष्ट येथें सांगितली नाहीं तर हा आमचा

लेख खरोखर अपुरा दिसेल. इतकेच नव्हे, पण आह्मी अनभिज्ञ व अंधकोटीत

गणले जाऊं. तेव्हां आमच्या स्वतःकरितां ह्मणून तरी, स्थलाभाव असतांहीं, या

कारागिराचें अल्पसें वर्णन केलेच पाहिजे. आह्मीं या कारागिरांचें नांव मुद्दाम

शेवटीं ठेविलें. याचें कारण ह्या कारागिराचा हात कीर्तिमंदिराचे अगदी तळम-

जल्यापासून तों अत्युच बुरुजापर्यंत सर्वत्र दिसतो. तेव्हां याची योजना कोणत्या

मजल्यावर करावी हें कळेना ह्मणून यांना शेवटापर्यंत ठेवावें लागले. या कारा-

गिराकडे प्रत्येक मजल्यांतील कांहींना कांही कुशलतेचें काम असून शिवाय एकंदर

कीर्तिमंदिराला सुधाधवल करण्याचें फारच कष्टतर काम यांजकडे सोपविलेलें आहे.

या कारागिराचें नांव वे० शा० सं० रा० रा० काशीनाथ पांडुरंग परब हैं होय.

यांचें नांव ' काव्यमाला' नांवाचा अत्युच बुरूज जोपर्यंत कायम राहील तो

अक्षयीं राहील अशी उमेद आहे तोपर्यंत तें तेथें फडकत राहील, यांत शंका

नाहीं. अस्तु या कीर्तिमंदिराचें संपूर्ण वर्णन करण्यास आह्मी समर्थ नाहीं.

तथापि हें अबजड काम जावजींस पारखशक्ति होती ह्मणून निर्विघ्न व निर्वेध पार

पडलें असें आह्मी पुनः एकवार ह्मणतों.

 दुसरा एक जावजींच्या अगीं अनुकरणीय व स्पृहणीय गुण होता. तोही नैसर्गिक

जातीचाच असावा लागतो. पण तो कांहीं अंशाने पाहून व शिकून येण्याजोगा

आहे. तथापि तो जातिवंत असला तर जसा चमकतो तसा पढविलेला किंवा

ठेंचा खाऊन आलेला चमकत नाहीं. पहिला गुण ह्मणजे मनुष्यपरीक्षेचा. हा

तर शिकून येत नाहीं असा आमचा पक्का ग्रह असल्यामुळे त्याला आह्मीं प्रथम

स्थान दिले आहे. त्या गुणाबरोबरच हा दुसराही गुण असणे आवश्यक आहे.

या दोघांची जोडी जर संगीन नसेल तर यावें तितकें यश येणें नाहीं. जावजींचे