पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




६४    चार चरित्रात्मक लेख.

_____________________________________________________

बुरुजांपर्यंत सर्व प्रकार अत्यंत उचित, समर्पक व कारागिरांना भूषणावह असा

आहे. या निरनिराळ्या मजल्यांकरितां ज्या कारागिरांचा जावजींनी संग्रह केला

आहे तो इतका कांहीं उत्कृष्ट व योग्य झाला आहे कीं, जावजींच्या पारख-

गुणाची जितकी स्तुति करावी तितकी थोडी आहे असे वाटावयास लागतें. रा०

सा० विनायकरावजी ओक या सुप्रसिद्ध बालबोध कारागिराकडे तळमजल्याचें

काम जावजींनी सोपविलें होतें. अगदी ठेंगण्या अल्पवयस्क मुलांपासून तो आ-

जन्मविद्यार्थीि जरठ बालांपर्यंत सर्वाकरितां या कारागिरानें असे कांहीं उत्कृष्ट

काम करून ठेविलें आहे की राजापासून तो रकापर्यंत यांची कृति सर्वांना रम्य,

आकर्षक व आसेचनक अशी झाली आहे. तळमजल्याच्या भिंती रंगविण्याक-

रितां एक चित्रकार जावजींनी संग्रही ठेवला होता. रा० श्रीरंग रामचंद्र

यांनी चित्रित केलेल्या भिंती पाहून कोणी वरें माना डोलविल्या नाहीत ?

अस्तु. पुढे या मजल्याच्या पुढल्या मजल्याकडे पहावें तर तेथले नियुक्त कारा-

गीर तर पहिल्या कारागिरापेक्षां कांकणभर अधिकच कुशल दिसतात. वास्तविक

प्रकार असा आहे कीं, जावजींनी निवडलेले सर्वच कारागीर शेलके आहेत.

सर्व पांढरे शुभ्र देदीप्यमान हिरे आहेत. मात्र कोंदणामुळे जसा हिऱ्या-

मध्यें गैरवाकव डोळ्यांच्या मनुष्यास फरक दिसतो तसा या कारागिरांमध्ये

फरक त्यांच्या त्यांच्या कडे दिलेल्या कार्यावरून दिसतो. बाकी एकाला काढावा

व एकाला ठेवावा तर मोठमोठ्या मर्मज्ञांस देखील खरी ओळख पटणार नाही,

अशी खरी स्थिति आहे. हा दुसरा सजला काव्यसंग्रह नांवाचा आहे. यावर

प्रथम कै० जनार्दनपंत मोडक कारागीर होते. परंतु लवकरच त्यांस परमेश्वरानें

आपल्याजवळ नेलें. तेव्हां हा मजला तयार करण्याकरितां रा० रा० वामनराव

ओक या नांवाचे कारागिराची जावजींनी योजना केली आहे. त्या कारागिराचें

काम असे कांहीं वठत आहे कीं, त्यांच्या तोडीच्या इतर कारागिरांसही निर्म-

त्सर होऊन माना डोलवाव्या लागतात. या मजल्यावर आणखीही पुष्कळ कुशळ

कारागिर काम करीत आहेत. कारण येथपर्यंतच पुष्कळांची पोंच आहे व पु-

ष्कळसा प्रेक्षकगण तेथूनच परततो. याचे पुढचे मजल्यावर काम करण्याकरितां

प्रो० राजारामशास्त्री भागवत, रा० सा० नारायण बाळकृष्ण गोडबोले व रा०

सा० रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे कुशल कारागीर प्रमुखतः दृष्टीस पडतात.

या मजल्याचें काम पाहयाला जाणारे प्रेक्षक अर्थात् कमी आहेत; कारण ज