पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० जावजी दादाजी चौधरी   ६३

_________________________________________________________

सुबकपणा, नीटनेटकेपणा, सफाई, नियमितपणा, चांगुलपणा, वगैरेबद्दलची जी

इतकी तारीफ आहे, त्या श्रेयाचे हे दोघे गृहस्थ पुष्कळसे भागीदार आहेत. जावजींना

जर खरी पारख नसती तर हीं रत्नें त्यांना लाधली नसती असें आह्मांस वाटतें.

आतां कारागीरमंडळीचीही पारख जावजींस कांहीं अजब होती. आपली कि

र्तिमंदिराची इमारत बांधण्याकरितां जावजींनी असे असे निवडक, वेचक व

हुशार कारागीर शोधून काढिले होते कीं, जरी ती इमारत मुंबईत काळकादे-

वीच्या रस्त्यावर त्या कारागिरांनी बांधिली तरी ती व तिच्या वरील नक्षी सुद्धां

फिलाडेल्फिया, बोस्टन, न्यूयार्क इत्यादि दूर पल्ल्यावरील लोकांना साफ दिसत होती

व आहे. ते कारागीर तर धन्यच आहेत, परंतु त्यांची खरी पारख करून

ज्याने आपल्या संग्रहीं त्यांस ठेविलें तो किती तरी धन्य ह्मणावा ! कै० महा-

देव मोरेश्वर कुंटे, रा० ब० शकंर पाडुरंग पंडित, कै० महामहोपाध्याय पंडित

दुर्गाप्रसाद हे या अत्युच्च शिखरभागांवरील कारागीर होत. यांनी अनुक्रमें

षड्दर्शन चिंतनिका, वेदार्थयत्न व काव्यमाला नांवांचे अत्यंत रमणीय, अत्युच्च

व अति कठिण असे तीन बुरूज बांधून ठेविले आहेत. यद्यपि हे

बुरूज अर्धेकच्चेच राहिले आहेत, तथापिझाले आहेत तितक्या

पुरते इतके कांहीं भक्कम व सुरेख झाले आहेत की त्यांकडे पाहणारे सर्व

लोक या कारागीरांच्या कारागिरीबद्दल थक्क होऊन गेले आहेत. हे बुरूज थोड्या

बहुत काळानें पुरे बांधून होतील अशी आह्मांस बळकट उमेद आहे, व हें व

डिलांच्या कीर्तिमंदिराच्या बुरूजांचें अवजड खरें पण अत्यंत लोकोपकारक कृत्य

रा० तुकारामजी तडीस नेतील अशीही पण आह्मांस उमेद आहे. तुकारामजीं-

कडे नुसतें वडिलांच्या मार्गानें जावयाचे आहे. कारागिरांची पारख करण्याचें अत्यंत

बिकट व जोखिमीचें काम करण्याचें ओझें त्यांच्यावर नाहीं. अस्तु. आतां या कीर्ति-

मंदिराचे अत्युच्च बुरुजांचें वर्णन पाहून कित्येकांना मद्रास इलाख्यांतील प्रसिद्ध

गोपुरांचें स्मरण होईल. पण या कीर्तिमंदिराचे रचनेत व त्या गोपुरांचे रचनेंत

फार मोठा फरक आहे. ती गोपुरें फार उंच असतात व मजले दाखविण्याक-

रितां खिडक्या असतात. त्यांचा बाह्य देखावा मात्र भक्कम असतो. आंतल्या

बाजूंनी मजले नसतात किंवा दर्शनीय भाग फारसा नसतो. तसा प्रकार या

जावजींच्या कीर्तिमंदिराचा नाहीं. ह्यांतील बाह्य व आन्तर ही स्वरूपें एकसारखी

दर्शनीय, उपयुक्त व भक्कम आहेत. अगदी तळमजल्यापासून तो पूर्वोक्त अत्युच