पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




६२   चार चरित्रात्मक लेख.

__________________________________________________

यजमानाच्या ठिकाणी असणें जरूर आहे. पण प्रधान गुण जी पारख ती जर

नसेल तर इतर गुण असूनही इमारत व्हावी तशी चांगली होत नाहीं. हा प्रधान

गुण जावजींचे अंग चांगलाच होता आणि याच गुणामुळे जावजींस इतके यश

आले असा आमचा पक्का ग्रह आहे. जावजी हे विद्वान् शब्दानें लोकरूढ जी

कोटी आहे तींतील नव्हते, किंवा ज्याचे योगानें गाढवाचा तेजी व पाजीचा

गाजी बनतो असा त्यांच्याजवळ पैसाही नव्हता. पण पुष्कळशा विद्वानांस व धना.

ढ्यांस जें पद अलभ्य तें त्यांस मिळाले. त्यांचें कीर्तिमंदिर या लोकांच्यापेक्षां

किती तरी पट उंच गेलें आहे. याचे कारण 'परीक्षा' नांवाचा गुण जाव

जीत चांगला होता. हा गुण शिकविण्याच्या शाळा नाहींत व गुरुही नाहींत. तो

उपजत असावा लागतो. तो शिकवून येत नाही. एका औदीच्य कवीचें ह्मणणें

आहे की :-

   'रागी बागी पारखी न्यायी और न्याव ।

  इन् पञ्चन् को गुरु नहीं, उपजत अंगस्वभाव |'

 त्याप्रमाणे परीक्षा ( पारख ) गुण हा जातिवंतच असावा लागतो व तो जा-

वजींच्या अंगी रगड होता. यामुळे कीर्तिमंदिराला लागणारे सर्व पदार्थ-माल-

मसाला, सामानसुमान व कुशल कारागीर लोक-या यजमानाला अगदी चोख

व नांव ठेवण्यास जागा नाहीं असे मिळाले. इतर यजमानांच्या अंगी हा प्रधान,

गुण नसल्यामुळे त्यांच्या इमारती तितक्या मानानें कच्च्या पडल्या आहेत. आतां

जें कांही आह्मीं येथवर हाटले आहे त्याची नीट समजूत पडावी हाणून दोन

चार उदाहरणें देतों. संपूर्ण उदाहरणमालिका त्यांच्या विस्तृत चरित्रांत आली

पाहिजे होती, परंतु रा० सा० ओकांनी बहुधा शालीनतेमुळे त्या भागाला अजी

टाळा दिला आहे. हा प्रकार बरा झाला नाही. आतां आमच्या सारख्या तट

स्थानें हें प्रकरण सविस्तर द्यावें तर आह्मां जवळ तितकें स्थळ नाहीं, व प्रसंगी

स्थळ जरी असतें तरी समग्र यथावत् जशी माहिती आह्मांस असावी तशी नाहीं.

तेव्हां थोडकींचशीं उदाहरणे देऊन आमच्या मुख्य विधानाचें समर्थन करतो.

रा० राणूजी रावजी आरू व रामचंद्र अमृत मोरे हे या कीर्तिमंदिराचे अनुक्रमें

मालमसाला व सामानसुमान होत. हे दोघे गृहस्थ ह्मणजे जावजींचे उजवे हात

होत. जावजींचे टैपांची जी आज यथायोग्य ख्याती आहे, व छापण्याचे कामाचा