पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० नावजी दादाजी चौधरी.   ६१

_________________________________________________________

टैपावर काम प्रथमतः निघू लागले. आमचे देशी छापखान्यांचे खरे व उत्कृष्ट

जनक गणपत कृष्णाजी हे होत. त्यांचे छापखान्यांत शिळेवर व टैपावर अशी दो-

न्हीं प्रकारची कामें फारच सुबक व दर्शनीय निघत. त्या छापखान्याचे मालकांनी

प्रतिसालीं पंचांग काढण्याचा क्रम आज सुमारें ४० वर्षे झाली सुरू केला. प्रथ-

मतः शिळाछापाचें पंचांग असे. पुढे त्यांनी सन १८६७ चे झणजे शके १७८९

सालचें पंचांग टैपावर काढले. आमच्या इकडे टैपावरचें हें पहिलें पंचांग होय.

रा० अग्निहोत्री यांस हें टैपाचें पंचांग पाहून आपले पंचांगही टैपावर काढण्याची

इच्छा झाली. तेव्हां त्या कार्याला लागणारें विशेष सामान तयार करण्याविषयीं

सदर अग्निहोत्री यांनी जावजींस सांगितलें. जावजींनी सर्व सामुग्री सिद्ध केली.

पण आपणास तें काम झेपेल असें अग्निहोत्री यांस वाटलें नाहीं व तें काम

करण्याचें आनुकूल्यही त्यांस राहिले नाहीं. फणसवाडींत अग्निहोत्र्यांचा वाडा ह्म-

णून जी मोठी इमारत आहे ती बिहुल सखाराम यांचीच. पण त्यांना पडता काळ

लागला होता. तेव्हां ही सर्व सिद्धता निष्फळ होणार असा जेव्हां पक्का निर्णय

झाला तेव्हां आपणच छापखाना घालून या सामुग्रीचा उपयोग करून घ्यावा

असा जावजींनी निर्णय केला, व ह्मणून त्या आपल्या कार्यालयाला व छापखा-

न्याला ' निर्णयसागर' हे नांव दिलें, व सन १८६९ साली त्यांनी शके १७९१

सालचें पंचांग टैपावर काढले. तेव्हांपासून आजपर्यंत त्यांचा प्रतिवर्षी पंचांग

काढण्याचा क्रम अव्याहत चालला आहे. येथपासून पूर्वोक्त पायावर इमारत चढ-

विण्याच्या विचारास आरंभ झाला. तोपर्यंत इमारत चढवावी किंवा नाहीं यात्र-

हल जावजींचे मनाचा निश्चय झाला नव्हता. परंतु सदरीं सांगितलेल्या योगानें

जावजींच्या मनानें इमारत चढविण्याचें घेतलें. मग इमारतीस आरंभ झाला.

ती इमारत आज २३।२४ वर्षे एक सारखी वाढत चालली आहे व मागच्या

सालच्या कामापेक्षां पुढच्या सालचें काम अधिक मजबूत, अधिक भव्य, व अ-

धिक आकर्षक असे होत चालले आहे.

कोणतीही इमारत सुबक, रमणीय, मजबूत व निर्दोष होण्यास त्या इमा-

रतीच्या यजमानाचे अंगी एक प्रधान गुण लागत असतो. त्या इमारतीला लाग-

णारा मालमसाला, सामान सुमान व कारागीर यांची यजमानाला चांगली पारख

करतां आली पाहिजे. तर इमारत निर्विवाद चांगली होईल. इतर गुणही त्या