पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




६०   चार चरित्रात्मक लेख.

__________________________________________________

पाहिजे. या बाबतीत खरी माहिती कोणास असेल त्यानें ती जगापुढे

मांडावी अशी आमची अगत्यपूर्वक सूचना आहे. दीनबंधुकारांस जावजीं-

विषयीं ही व इतर माहिती पुष्कळ आहे असे त्यांच्या अनेक दर्पोक्तींवरून

दिसतें. तर त्यांनीं हैं लोकांचें या बाबतींतील आंध्य दूर करण्याचें मनावर घेत

ल्यास लोकांस पुष्कळ उपयोग होईल. अस्तु. जावजी स्वतंत्र धंदा करूं लागल्या-

पासून चार वर्षेपर्यंत त्यांनी जुने छापखाने विकत घेण्याचा व नवे करून विक-

ण्याचा क्रम चालविला होता. या उद्योगांत त्यांना यश येत गेलें, व याच

उद्योगानें ते बरेच सांवरले. सन १८६८ साली त्यांनी आपल्या छापखान्याला

'निर्णयसागर' हे नांव दिले व तेव्हांपासून त्यांच्या कारखान्याला ठामपणा आला;

तेव्हांपासूनच त्यांच्या उद्योगदिशेला स्थायिकत्व आले व त्यांच्या अजरामर कीर्ती-

ची जणूं काय कोणशिला स्थापिली गेली.


 जावजींच्या ऊर्जितदशेची व तदनुरोधानें त्यांस मिळालेल्या कीर्तीच्या

पायाची सुरुवात अठावीस वर्षापूर्वी झाली. चार वर्षे पायाचें काम चाललें होतें.

तितक्या वेळांत चार बरसाती लोटल्या. तेव्हां पाया फार मजबूत झाला असा-

वा हैं सांगणें नकोच. जेवढ्या ह्मणून मोठ्या भक्कम इमारती होतात तितक्यांचा

पाया मजबूत व अढळ होण्याकरतां एकादा तरी पावसाळा त्या पायावरून जाऊं

देण्याचा इंजिनियरिंग संप्रदाय आहे. तदनुरोधानें ह्मणा किंवा कोणत्याही कार-

णानें ह्मणा, हा पाया चार वर्षीपर्यंत तसाच राहूं दिला होता. पुढे तरी त्या पायावर

लवकर इमारत चढवावी असा जावजींचा विचार होता असे दिसत नाहीं.

परंतु असा कांहीं एक अचानक योग आला की, त्या पायावर इमारत चढवि-

ण्याचें जावजींस भाग पडलें. 'अथवा भवितव्यानाम् द्वाराणि भवंति सर्वत्र '

ह्या कालिदासोक्तीचा अशा वेळी प्रत्यय येतो. तो असा आला. रा० रा० विठ्ठल

सखाराम अग्निहोत्री यांचा शिळाछापखाना मुंबई प्रांतांतील छापखान्यांच्या इति-

हासांत अवश्य नमूद करण्याजोगा होऊन गेला, व तसा इतिहास कधीं कोणीं

लिहिल्यास यांच्या छापखान्याचा त्यांत अवश्य उल्लेख होईल. गणपत कृष्णाजींचा

छापखाना, गिटे, खातू व अग्निहोत्री यांचे छापखाने, यांनी महाराष्ट्र व संस्कृत

साहित्याचे पुनरुज्जीवनास अतिशयच साहाय्य केले हे कृतज्ञतापूर्वक व निरभिमा-

नतया सर्व कबूल करतील यांत शंका नाहीं. गणपत कृष्णाजींच्या छापखान्यांत