पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० जावजी दादाजी चौधरी.   ५९

_______________________________________________________

ओक यांचे नादीं न लागतां रा० सा० लोखंडे यांचेकडून जावजींचें चरित्र लिह-

वावयाचें होतें; ह्मणजे निव्वळ सत्य बाहेर आलें असतें. अस्तु. झाली गोष्ट तिला

इलाज नाहीं. पण अजून जरी रा० सा० लोखंडे मेहरबानी करतील तरी खरा

प्रकार बाहेर येईल व लोकांवर महदुपकार होतील. पण जोपर्यंत हें सत्यनिरूपण

चांगलेंसे होत नाही तोपर्यंत कोणा तरी सज्जनांचे साहाय्यानें जावजींना स्वतंत्र

कारखाना उभारतां आला एवढेच आह्मीं ह्मणतों. पण या विषयाची खरी माहि-

ती मिळणें फारच महत्त्वाचें आहे. कारण जरी ही गोष्ठ कित्येकांना अगदी क्षुल्ल-

कशी वाटेल तरी ती तशी नाहीं असे आमचें ह्मणणें आहे. या क्षुल्लकशा

गोष्टीमुळे जावजींना श्रेष्ठपद (शेटजीपणा) मिळालें व आज जे जावजी

त्रिजगांत ( एशिया, युरोप व अमेरिका ) प्रसिद्धीस आले आहेत व सर्व समंजस

विद्वान् लोकांचे स्तुतिविषय होऊन बसले आहेत ते याच लहानशा पण अति-

महत्त्वाच्या गोष्टीमुळेच, असें कोणीही कबूल करील. मोठमोठ्या मनुष्यांचे आयु-

वक्रांत काय किंवा देशाच्या इतिहासचक्रांत काय, या दिसायाला क्षुद्र अशा

गोष्टींनी अतिमहत्त्वाचे व चिरंतन असे उलट किंवा सुलट असे वेढे देऊन ठेवले

आहेत कीं, मोठमोठ्या या चक्रपरीक्षक मंडळीना देखील ते वेढे दुरूह्य व दुर्ज्ञेय

झाले आहेत. ज्याप्रमाणे मोठमोठाले पूल हे लहानशा दिसणाऱ्या पण खऱ्या

महत्त्वाच्या मत्स्याच्या जोरावर उभे असतात, त्याप्रमाणेच मोठमोठ्यांचे आयुः-

सेतु अगदी लहानशा मत्स्याचे जोरावर अढळ उभे आहेत. तेव्हा अशा

लहानशा दिसणाऱ्या गोष्टींची माहिती जगास असणे अगदी जरूर आहे. जगां-

तील ज्या प्रसिद्ध व चिरपरिणामी उलाढाली झाल्या आहेत त्या सर्वोचें मूळबी--

ज पाहूं जातां तें अगदी क्षुद्र गोष्टींतच आढळेल. आह्मी ह्मणतों या गोष्टीची

साक्ष पटविण्यास इतिहास कंबर बांधून तयार आहे. तेव्हां जावजींना स्वतंत्र

कारखाना काढण्यास ज्यांनी ज्यांनी ह्मणून अनेक प्रकारांनी साहाय्य केले

असेल त्या सर्व लोकांविषयीं माहिती जावजींचे चरित्रांत अवश्य आली पाहिजे.

या एका किंवा अनेक सज्जनांची मदत जर जावजींना नसती तर जावजी अखेर

पर्यंत कीर्तिमंदिरांतील रंगभूमीवर आले नसते, व त्यांच्या अंगचे अनेक

स्पृहणीय व अनुकरणीय गुण जागच्याजागी जिरून गेले असते. कोणत्याही

गुणविकासाला प्रसंगानुकूल्य पाहिजे. आतां हें प्रसंगानुकूल्य कसें व कोणाचे

योगानें मिळाले त्याचा इतिहास गुणिपुरुषांच्या चरित्रांत अवश्य दाखल झाला