पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





५८   चार चरित्रात्मक लेख.

_____________________________________________________________

कामावर होते. याच सुमारास ह्मणजे सन १८६२ साली इंदुप्रकाश छापखाना सुरू

झाला. तेथें ते टैप ओतण्याचे कामावर दीड दोन वर्षे होते. तेथून नंतर ते ओरि-

एन्टल प्रेस नांवाचा मिशनरी लोकांचा कारखाना झाला होता त्यांत ३० रुपयांवर

राहिले. तेथें कांहीं दिवस काढल्यावर त्यांचे मनांतून टैप पाडून विकण्याचा स्वतंत्र

धंदा करावा असें आलें. परंतु स्वतंत्र धंद्यास भांडवल हवें. जावजीजवळ स्वःतची

पुंजी कांहीं नव्हती; आणि ती असावी तरी कशी ? दहा पांच रुपये पगार आणि

मुंबईचें राहणे यांचा मेळ बसून शिल्लक पडावी कशी व पुंजी व्हावी कशी ?

तेव्हां जावजींजवळ पुंजी नसावी हे अगदी ठीक आहे. पण जावजींनी नोकरी

सोडून स्वतंत्र एक लहानसा कारखाना काढला हीही गोष्ट निर्विवाद आहे.

तेव्हां जावजींना कोणाची तरी मदत असली पाहिजे. आतां ती कोणाची होती ही

गोष्ट मात्र वादग्रस्त आहे व तिचा निर्णय करण्याचें जोखीम आह्मी आपल्या अंगा-

वर घेत नाहीं, इंदुप्रकाशकार ह्मणतात की, त्या छापखान्याचे त्यावेळचे मालक वे०

शा० सं० रा ० रा० केशव शास्त्री गाडगीळ व लक्ष्मण शास्त्री हळबे व रा०

पांडुरंगजी वनारसे यांच्या मदतीनें जावजींनी हा कारखाना उभारला; सुबोधप-

त्रिकाकार ह्मणतात कीं, बनारसे यांच्याच मदतीनें जावजी या कामास प्रवृत्त

झाले; दीनबंधूकार यांचा बनारसे यांजवर कटाक्ष असून ते जावजींचे मामास

सर्व श्रेय देतात; काव्यसंग्रहकार रा० रा० वा० दा० ओक यांनी मोठ्या

युक्तीनें या वादांतून पळ काढला आहे. व त्यांच्या लिहिण्यावरून ते आमच्या-

सारखेच यांतील खऱ्या प्रकाराविषयों अनभिज्ञ असावे असे वाटतें. त्यांच्या मतें

रा० रा० आरू व बनारसे या दोघांच्या मदतीनें जावजी पुढे सरसावले. व

अखेर विनायकरावजी ओकांनी जावजींचे उत्कृष्ट चरित्रांत या वादविषयक

सर्व मंडळींना मामा साहेबांससुद्धां-एकीकडे ठेवून खुमा शेटींना हा स्वतंत्र

कारखाना काढण्याचें धैर्य जावजींस येण्याचें श्रेय दिले आहे. तेव्हां ज्या मंड

ळीचा जावजीशी निकट संबंध होता अशा मंडळींत जर इतका जबर मतभेद

आहे तर आमच्या सारख्या दूरस्थांनी याविषयी काय लिहावें ? जितक्या मंड•

ळीनें ह्मणून जावजीचे लहान मोठे चरित्रलेख लिहिले आहेत त्या सर्वांत 'दीन-

बंधुकारांना जावजींविषयीं साद्यंत' व बरीच विश्वसनीय माहिती असावी असे

त्यांच्या लेखांवरून वाटतें. वास्तविक ह्मटले ह्मणजे रा० तुकारामजींनीं रा० सा०