पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  कै० जावजी दादाजी चौधरी.   ५७

________________________________________________________________{nop}}

सांपडण्याचा संभव होता. परंतु जावजींचा जन्म ५०/५५ वर्षापूर्वी मराठे

ज्ञातीत झाला. त्यावेळी या मराठे ज्ञातीला उन्नतावस्थेप्रत पोंचविण्याचा आ-

जच्या सारखा स्तुत्य प्रयत्नही चालू नव्हता. तेव्हां जावजींचा जन्मकाल आज-

वर संदिग्ध असावा हें साहजिक आहे. आह्मी येथवर जन्मकाल या शब्दाचा

उपयोग केला आहे त्याचा व्यापक अर्थ घेतला पाहिजे; ह्मणजे जावजींचा जन्म

कोणत्या साली झाला हे देखील निश्चयात्मक कोणास ठाऊक नाहीं.. ठोकदृष्टीनें

पाहतां त्यांचा जन्म स० १८३८।३९ साली झाला. ठाम तिथि, वार, नक्षत्र व मास यांचे

माहितीची अपेक्षा कशास करावी? आतां जोतिःशास्त्राचे बलावर कोणी पटवर्धन किंवा

गोविंद चेढी ती माहिती देतील तर जावजींचे चिरंजीवांनी मिळवून आपल्या व

डिलांच्या विस्तृत चरित्रांत समाविष्ट केल्यास श्रद्धालु लोकांची जिज्ञासा बरीच तृप्त

होईल. बाकी जावजींविषयीं आजवर जे लेख आमचे पाहण्यांत आले आहेत त्यांत

ही माहिती दिलेली नाहीं व आह्मांलाही ती शोध करितां मिळाली नाहीं. त्याचप्र-

माणें त्यांचे बालपणचें वृत्तही कांहीं माहित नाहीं. ते त्या काळच्या इतर निर्धन

कुळांतील मुलांप्रमाणेच सैरा वैरा फिरणारे असावेत. शालादि संस्कार त्यांस

झाले असल्यास फारच अल्पकालीन झाले असावे, कारण त्यांचें एकंदर

आयुष्य जरी मुद्रणव्यापारांत गेलें तथापि त्यांस स्वतःची सही करण्यापुरती

लेखनकला व साधारण वाचण्यापुरती वाचनकला इतकीच काय ती विद्या

अवगत होती. त्यांचे वयाचे ७|८ वे वर्षी त्यांचे वडील वारले. मुंबई सारख्या

ठिकाणी राहणे आणि त्यांतून घरचा कमावता मनुष्य नाहींसा झाला, ह्मणजे

आधींच निधन अशा कुटुंबाची काय स्थिति होत असेल त्याची कल्पना

देखील दुःसह होय. तेव्हां त्या स्थितीचें वर्णन किती तरी दुःखद होईल !

ह्मणून त्या गोष्टीचा उल्लेखच नको. पण अशा स्थितींत जावजींच्या मातुःश्रीनें

धीर सोडला नाहीं. त्या माउलीने फळे विकण्याचा रोजगार करून आपला व

आपल्या मुलाचा उदरनिर्वाह चालविला. वयाचे दहावे वर्षी जावजी हे २

रुपये दरमाहावर अमेरिकन मिशन प्रेसमध्ये टैप घांसण्याचे कामी नोकर झाले.

या छापखान्यांत ते सुमारे १२ वर्षे निरनिराळ्या कामांवर होते, व वयाप्रमाणे

व हुशारीप्रमाणे २ रुपयांपासून १२ रुपये दरमहापर्यंत त्यांचा पगार चढ़त

गेला. पुढे तो छापखाना 'मुंबई टैम्स' मध्ये सामील झाला. तेथेंही हे कांहीं दिवस