पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




५६   चार चरित्रात्मक लेख

___________________________________________________________

याचा सुद्धां पत्ता नाहीं. कोणी ह्मणतात यांचे पूर्वज मावळांत राहत, कोणी

ह्मणतात उत्तरकोंकणांत राहत, कोणी ह्मणतात पुरंदर तालुक्यांत राहत, असा

सर्वच घोंटाळा आहे. चौधरी या आडनावांवरून इतकी गोष्ट अनुमित करतां

येते कीं, एका काळीं जावजींचें घराणे राजमान्य, राजाधिकृतमान्य किंवा

ग्रामस्थमान्य तरी होतें. तें घराणे कालचक्राचे फेन्यामध्ये सांपडून त्यांतील

एका वंशजास मुंबईतील एका पेढीवर तगाददाराची नोकरी करावी लागली. ते

वंशज जावजींचे वडील होत. यांस जावजीखेरीज अन्य अपत्यें झालीं असल्यास

माहित नाहीं. असल्यास माहित व्हावें करें ? जर कोणा गृहस्थाचे कुळगोताची,

मूळ वसतीस्थानाची किंवा इतर माहिती विचारावयास जावें, तर बहुतेक असा

प्रश्न दत्त ह्मणून उभा असतो कीं 'कां हो, तुह्याला यांचेकडे मुलगी द्यायाची

ध्यायाची आहे ह्मणून इतका बारीक शोध करतां?' तेव्हां एखाद्या वर्ण्यव्यक्तीविषयीं

लिहायाचें ह्यटल्यास त्याचे अनुषंगिक माहितीविषयीं चकारही काहूं नये अशी

आमची स्थिति आहे; कारण संग्रहणीय अशी माहितीच मिळणें कठिण आहे.

तेव्हां जावजींचे जन्मवृत्तापर्यंतची पूर्वीची माहिती यथातथाच आहे. जावजींचे

आजे मुंबईस येऊन स्थायिक झाले. त्यांचें उंबरखाडीवर एक घर होतें. ते गोदींत

नोकर होते. त्यांचे चिरंजीव दादाजी हे एका पेढीवाल्याकडे शिपाई होते.

दादाजीचे चिरंजीव जावजी यांचा जन्मकाळ त्यांच्या बाळपणच्या इतर

वृत्ताप्रमाणेच संदिग्ध आहे, व असे असणे अगदी ठीक आहे. कारण जावजींचा

जन्म अगदीं निर्धन कुलांत झाला होता, तेव्हां गरीबाला हे धर्मकर्मादिकांचे

सोहाळे कुठून प्राप्त होणार ? होळकर साहेबांची पत्नी अंतर्वत्नी असली ह्मणजे

होणाऱ्या अपत्याचें जन्म, जन्मपत्रिका, वर्षफल, कुंडलिका होत असतात. तसा

प्रकार जावजींची मातुःश्री जेव्हां गरोदर झाली होती तेव्हां होण्याचा संभव

नव्हता. ही बाई प्रसूत झाली असेल तेव्हां शेजायापाजान्यांना देखील हैं

जन्मवृत्त कळले असेल कीं नाहीं याची आह्मांस शंकाच आहे. त्यांतून जावजी

हे आपल्या आंगच्या गुणांनी पुढे मुद्रणकारचतुर्धर ( चौधरी ) होतील, राज-

मान्य ( जस्टिस आफ धी पीस ) होतील, व हजारो माणसांचे पोशिंदे होतील

असें जर पूर्वी कळले असते तर यांचा जन्मकाळ व इतर बालवृत्त हीं सर्व

कदाचित् कोणीं टिपून ठेविली असती. पण तसा प्रकार व्हावा कसा ? शिवाय

जर ब्राह्मणकुलांत जावजींचा जन्म झाला असता तर कदाचित् त्यांचें जन्मटिप्पण