पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० जावजी दादाजी चौधरी.   ५५

______________________________________________________________________________

प्रकारांत मूळचे गुणकर्मविभागाचा तर आधार आहेच. पण त्यांत अनुवंशी

हेंही सामील केलें गेलें आहे. तेव्हां मोठमोठ्या ठिकाणी ( विशेषतः राजकीय

महत्त्वाचे ठिकाणीं ) या कर्मकार जातींत एक एक नायक असतो. त्याला

‘चौधरी' ह्मणत असतात. सरकाराला किंवा एखाद्या विशिष्ट अधिकृताला अमुक

एक जातीच्या कर्मकारांची जरूर पडली ह्मणजे त्या त्या जातीचे चौधऱ्यांस

बोलावून आणून त्याला जें काम असेल तें सांगितले ह्मणजे कार्यभाग बिनबोभाट

उरकतो. हा चौधरी किताब हिंदुस्थानांत जाति किंवा धर्म याचा विचार न

होतां कर्मकार टोळीच्या नायकास देण्याचा संप्रदाय आहे. या योगानें ही चौधरी

पदवी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध, ( सर्व प्रकारचे कर्मकार वर्ग), अतिशुद्र व

यवन या सर्व प्रकारचे लोकांस राजाज्ञेने किंवा ग्रामस्थांचे संमतीने दिलेली

आढळते. अस्तु. तेव्हां कांहीं एक कर्मकार वर्गाचे चौधरीपण जावजींच्या कुलांत

असावें असा निष्कर्ष निघतो. आतां आमच्या इकडे इतिहासप्रियता लोकवृत्तीत

फार कमी, किंबहुना नाहीं असें ह्यटल्यास वावगे होणार नाही. यामुळे सर्व

बाबतींत आमच्या इकडे अंधत्व उत्पन्न झाले आहे. सर्व गोष्टी तर्कावर घ्याव्या

लागतात. निश्चयात्मक ह्मणून कांहींच सांगतां येत नाहीं. ही जी इतिहासा-

विषयींची उदासीनत्रृत्ति आमचेकडे दिसत आहे ती आजकालची नसून फार

प्राचीन आहे; व प्राचीन तेवढे सर्व गोड अशा आमच्या दृढ समजुतीमुळे

आमच्यांत अद्यापि तें औदासीन्य टाकण्याची प्रवृत्ति होत नाहीं ! ही स्थिति

आमच्या देशापुरती तरी सार्वत्रिक असल्यामुळे अमुक एक विशेष वर्गाकडे

याचा दोष आहे असे आमचें ह्मणणें नाहीं. मोठमोठ्या राजघराण्यांचा जेथें

पत्ता नाहीं तेथें जावजींच्या कोणा पूर्वजास चौधरी हें पद मिळालें, व कोणत्या

कामाकरितां, व कोणत्या राजाचे कारकीर्दीत ते मिळालें, याचा पत्ता लागण्याची

अगदी आशा नको. फार तर काय पण जावजींचे पूर्वज मूळचे राहणारे कोठील

___________________________________________________________

कांही कांहीं जावजींचीं ह्मणून मतें लिहिलीं आहेत ती सर्वसंमत होण्याजोगी नाहीत.

परंतु त्याविषयी विशेष चर्चा करण्याचे प्रयोजन नाहीं. कारण जावजी हे विद्वान

नव्हते व विद्वत्तेबद्दल त्यांस घमंडही नव्हती. तेव्हां त्यांच्या मतांवर लोक भिस्त

ठेवणार नाहीत व तीं 'आधारादाखल समजणारही नाहींत. एकंदरीत सदर पुतस्क

सर्वप्रकारें आल्हादकारक, संग्राह्य व वाचनीय झाले आहे.