पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




५४   चार चरित्रात्मक लेख.

______________________________________________________________

Union ह्मणतात तसा प्रकार आमच्या इकडेही कर्मकार ( ह्मणजे कामकरी )

लोकांचा आहे. आह्मी त्या प्रकाराला जात ह्मणतों. आमच्या जातीच्या

______________________________________________________________

होती. रा. सा. स जावजी गुरु मानीत. त्यांच्या जवळ जावजी आपले हितगुजही

सांगितल्याशिवाय राहत नसत. ठीकच आहे. तोरण्याचा किल्ला सर करणाऱ्या शिवा-

जीला जसा कोंडदेवसुत दादोजी हाच योग्य गुरु होता, तसा ह्या मुद्रणकलादुर्गास सर

करणाऱ्या जावजींस कोंडदेवसुतच योग्य होय अर्से कोण नाही ह्मणणार ?

तेव्हां जावजींविषयीं पूर्ण माहिती या चरित्रांत येईल असे वाटत होतें, व ह्मणूनच

सदरीं आह्मी 'विस्तृत' अर्से या तेवेळीं भविष्यचरित्रास म्हटले होते. परंतु हे पुस्तक

पाहतां तें विशेषण सार्थक नाही असें ह्मणावे लागते. हे चरित्र फारच त्रोटक आहे

हे पाहून आमची फार निराशा झाली.

 आतां चरित्रे कशी असावी, त्यांत कोणकोणती उपांगें असावीं, वगैरे गोष्टी आ-

मचे महाराष्ट्र ग्रंथकारांपैकीं जर कोणास पूर्णपणें अवगत असतील तर त्या प्रमुखत्वें

रा. सा. ओकांसच असल्या पाहिजेत व आहेत. रा. सा. ओक यांनी मोठ्या लोकांची

स्वत: दहा पांच वरींच मोठी चरित्रे लिहिली आहेत; शेंदोनशे त्रोटक चरित्रे लिहिली

आहेत व निदान हजार पांचरों तरी त्यांनी चरित्रग्रंथ वाचले असावे. तेव्हां अशा

बहुश्रुत गृहस्थाचे हातून विशेषतः जावजींचे चरित्र ह्मणजे रसिक लोकांस अपूर्व

पक्कान्न मिळेल अशी लोकांची अपेक्षा असल्यास त्यांत कांही नवल नाही. परंतु ती

लोकांची अपेक्षा अगदीं पुरली नाही. हें चरित्र असें त्रोटक व अपुतैं ठेवण्यास रा. सा.

ओकांस कांहीं सबळ कारणे असतील. पण लोकांना ती कारणें सवळ

वाटायाची नाहीत. तेव्हां आह्मां लोकांचा रा. सा. ओकांनी फारच

आशाभंग केला याबद्दल वाईट वाटतें. ज्ञानचक्षूंतील लेखांत किंवा काव्यसंग्र-

हाचे लेखांत जितकी कांहीं जावजींविषयीं व तत्संबंधीयांविषयी माहिती आली आहे,

तितकी देखील प्रस्तुत चरित्रांत समाविष्ट झालेली नाहीं. जावजीसारख्या सत्पुरुषास

जिने आपल्या उदरांत वागविलें व पुढे कित्येक वर्षेपर्यंत त्याला वाढविले त्या माउलीचें

नांव किंवा तिचा उच्चारही या पुस्तकांत नसावा, किंवा ज्या सतीबद्दल जावजींचें प्रेम

अत्यंत निर्मल, सरल व अस्खलित होते त्या सतीचें नांव व तिजबद्दल थोडीशी इतर

माहिती - म्हणजे तिचीं अपत्यें व तिचा सुनालेकींशीं व्यवहार वगैरे-देखील नसावी

ही कांहीं थोडी आश्चर्यावह गोष्ट नाहीं. अस्तु, बाकी अंत:स्वरूपाचा भाग उत्कृष्ट आहे.