पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० जावजी दादाजी चौधरी.   ५३

_______________________________________________________________________

 जावजी दादाजी हे जातीचे मराठे होते. यांचे आडनांव चौधरी होतें.

चौधरी हे कार्यवाचक नांव आहे. ज्याला इंग्रजीत Guild किंवा Trade

______________________________________________________________________

आपली पितृभक्ति, उचितज्ञता, मार्मिकता हीं व्यक्त केली आहेत. त्याचप्रमाणे आपल्या

चडिलांनी स्वतः संपादिलेले मुद्रणकलाचतुर्धरत्व आपण अखंड व अरखीलत चालवूं

असें तुकारामजींनी या पुस्तकाच्या बाह्य स्वरूपानें जणूं सर्वांना आश्वासन दिले आहे,

असें हें पुस्तक पाहतांच मनांत येतें. 'लब्धस्य परिपालनम्' हे संपादण्यापेक्षां एका

तऱ्हेनें ज्यास्ती कठिण आहे. 'क्लिश्नाति लब्धपरिपालनवृत्तिरेव अशा सारखीं अनु-

भवसिद्ध विधानें पुष्कळ आहेत. तेव्हां तें कठिण काम करण्याचे सामर्थ्य तुकाराम-

जींचे अंगीं आहे असें या पुस्तकाच्या बाह्यस्वरूपावरून पाहून आम्हांस फार संतोष

होतो. हें सामर्थ्य तुकारामजींस सदैव असो व दिवसेंदिवस तें वृद्धि पावो अर्से आह्मी

अंतःकरणपूर्वक इच्छितों, ज्या ज्या लोकांना ह्मणून मुद्रणकलेची बारीक सारीक

बरीच माहिती आहे व ज्यांस सौंदर्यविषयक दृष्टि आहे ते सर्व लोक प्रस्तुत पुस्तकाचें

एकंदर बाह्यस्वरूप व त्याची उपांगें पाहून अत्यंत आनंदित झाले. व 'श्वानवदुर्गुरायते'

ही जी समानकर्मीण व समानधर्मीय लोकांची वृत्ति असते ती ते विसरून गेले व

तुकारामजींची व त्यांच्या साहाय्यकांची त्यांनी तारीफ केली आहे. अस्तु.

 आतां या पुस्तकाच्या अंत: स्वरूपाच्या संबंधाने अभिप्राय देण्यास आमची लेखणी

कचरते. ठीकच आहे. कां नाहीं कचरणार ? लहान तोंडाने मोठा घांस तिने घ्यावा

कसा ? वि. ज्ञा. विस्ताराचा व रा. सा. विनायकरावजी ओक यांचा शिष्यगुरुसंबंध

किंवा अंशतः पोष्यपोषकसंबंध असल्याकारणाने त्याची लेखणी रावसाहेबांसारख्या

महाराष्ट्र भाषेतील ग्रंथकारशिरोमणींचे कृतीबद्दल बरावाईट अभिप्राय देण्यास कच-

रावी हैं अगदीं युक्त आहे. तशांतून 'स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनो विधि:' असा

वास्तविक प्रकार असल्यामुळे या चरित्राचे अंतःस्वरूपाविषयों वि. ज्ञा. विस्तारानें

कांही लिहूं नये हैं युक्त आहे. परंतु 'गुरुर्खा गुरुपत्रो वा' या न्यायाने किंवा रा. सा.

नीं आह्मांस व सर्व जगास 'तुम्ही आपले कर्तव्य करा, तें करण्यास चुकूं नका’ ‘मुखें

सत्य,अंगे विनीत' असे व्हा, अशा त-हेच्या वारंवार केलेल्या उपदेशांप्रमाणे वि. ज्ञा.

विस्तारास किंवा प्रस्तुत लेखकास या शाब्दचरित्राविषयीं काय वाटतें तें कळविण्या

-

विषयीं तो धाडस करितो. या औद्धत्याबद्दल रावसाहेब क्षमा करतील..

 सदर पुस्तक पाहण्यापूर्वी हे जावजींचे चरित्र विस्तृत होईल व भरपूर होईल

असे वाटत होतें. कारण रा. विनायकराव यांस जावजीची इतरांपेक्षां पुष्कळच माहिती