पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




५२   चार चरित्रात्मक लेख.

च्या जीवनवृत्तांताचीं टांचणें पाहिजे होती. ती जावजींच्याखेरीज इतर फार

थोड्यांना देतां आली असती. कारण त्यांचें वृत्त इतरांस माहित असण्याचा संभ-

व नव्हता. अशा प्रकारची माहिती असण्यास संपत्ति, उच्च कुल, मोठा गोतवळा,

विद्या, इत्यादि जीं अवश्य साधनें तीं आमचे प्रियमित्रासंबंधानें नव्हतीं असें

पुढील वृत्तांतावरून लक्षांत येईल. तेव्हां माहिती मिळायाचें साधन खुद्द जावजी.

त्यांना तर आत्मस्तुतीचा विटाळ होता. त्यांच्या जीवनवृत्तांतांत स्मरणीय असा

अंश दिसत नव्हता. या योगानें त्यांच्या जवळच्या व निकट संबंधांतील लोकांस

देखील जशी असावी तशी त्यांच्या विषयींची माहिती नाहीं. नाशिककर

क्षेत्रस्थ ब्राह्मणाच्या चिकाटीनें जी काय माहिती बाहेर आली आहे तेवढीच लोकांस

माहित आहे, व ती आतां ज्ञानचक्षूंत प्रसिद्धही झाली आहे. ह्या दोन मुख्य

कारणांमुळे आमचे जवळची सामुग्री अगदीच अल्प आहे. शिवाय आमचे व

जावजींचे एक संमाननीय मित्र जावजींचें विस्तृत चरित्र लिहीत आहेत असे

खात्रीलायक आधारावरून कळतें. तेव्हां त्या विस्तृत चरित्रभागाकडे आमचे

वाचकांस बोट दाखवून आह्मी आज हे प्रकरण थोडक्यांत आटपून घेतों.*

___________________________________________________________

  • हा लेख बहुतेक लिहून तयार झाल्यावर सदरीं निर्दिष्ट विस्तृत चरित्र छापून

प्रसिद्ध झाले. तें चरित्र जावजींचे प्रिय मित्र, मंत्री, गुरु व आश्रित रा० सा० विनायक

कोंडदेव ओक यांनी लिहिले आहे. जावजींचे वडील चिरंजीव रा० तुकारामजी यांनी

तें छापून प्रसिद्ध केर्ले, आहे व ज्यांचा ज्यांचा ह्मणून निर्णयसागराशीं व जावजींशीं

प्रत्यक्ष किंवा परंपरया संबंध पोंचत होता अशा सर्वोस या चरित्राची एक एक

प्रत पाठवून दिली आहे. तेव्हां आमचेकडेही त्याची एक प्रत आली आहे.

तिचा आम्ही परमादरानें स्वीकार केला आहे हें कांहीं सांगणे नकोच.

प्रस्तुत पुस्तकाचीं अन्तर्वाह्य स्वरूपें जावजींच्या चरित्राची अनुक्रमें शाब्द व प्रत्यक्ष

प्रमाणे आहेत. जावजी हे आमचे इकडील मुद्रणकलाचतुर्धर होते, ते उदार होते,

ते साधे होते, ते मोठे रसिक व नामिंक होते, व त्यांनी महाराष्ट्रांतील मुद्रणकले-

च्या सर्व कामांत कमाल करून सोडली होती - ह्या सर्व गोष्टी प्रस्तुत पुस्तकाचें वाह्य-

स्वरूप पाहतांच प्रत्यक्ष मूर्तिमंत डोळ्यांपुढे उभ्या राहतात. तुकारामजींनी ह्या पुस्त-

काचे द्वारें एकसमयाबच्छेदेकरून आपल्या वडिलांची मूर्ति, कृति, कौशल्य, कल्पकता,

कर्तबगारी व कार्यकारिता इत्यादि गोष्टी प्रत्यक्षतया आम्हां सर्व परिचितांस देऊन