पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




   कै० जावजी दादाजी चौधरी.   ५१

_________________________________________________________________________

आतां जावजींचें आह्मी अल्पसें चरित्र कां देणार व विस्तृत कां लिहीत नाहीं

असा सहज कोणीही प्रश्न करील. त्यांतून त्यांचा व आमचा वीस वर्षांचा परि-

चय, घरोबा व ऋणानुबंध. तेव्हां आह्मी या आमच्या प्रियमित्राचे विस्तृत

जीवनचरित्र लिहावें हें उचित होय. खरें आहे; परंतु विस्तृत चरित्र देण्यापुरती

आमचेजवळ सामुग्री नाहीं. सामुग्री नसण्याचें मुख्य कारण आमचा हलगर्जी-

पणा. आमच्या लोकांची वृत्ति इतिहासप्रिय नाहीं. इतिहास लिहून ठेवण्याकडे

किंवा संग्रह करण्याकडे आमचे लोकांची फारच कमी प्रवृत्ति आहे, किंबहुना

नाहीं असे म्हटल्यासही चालेल. आतां कोणी ह्मणतील कीं, जावजींचा नांव-

लौकिक आज दहावीस वर्षात झाला, तेव्हां त्यांचेविषयी काय माहिती मिळवा-

याची ? तर जावजी सोडून द्या, आणि परवां नुकते परलोकवासी झालेले जंगली

महाराज घ्या. ते तर संस्मरणीय अशा कुळांत जन्मलेले किंवा संग्रहीत होते ?

तसे जर ते नसते तर आमचे सरकारची त्यांजवर इतकी निगाह्ह्वानी कां असती ?

त्यांना ५०० रुपये माहेवारी पेन्शन सरकार देत होते तेव्हां ते तर उपटसुंभ नव्हते ना?

पण त्यांचेविषयीं आह्मांस कितीशी माहिती आहे ! नाहीं ह्मणायाला. सातारा येथील

' बोधसुधाकरा' नें या महाराजांसंबंधानें चांगली माहिती दिली होती. बहुतेक वृत्त-

पत्रांनी त्यांच्या मृत्युवार्तेपलीकडे उल्लेखच केला नाही. एकदोन वृत्तपत्रकारांनी या

महाराजांचें जें इतिवृत्त दिले आहे तें वाचलें असतां गटारयंत्रावरील तपकीर ओ-

ढीत बसलेल्या भटांस जितकी त्यांच्या व्यवसायाखेरीजची माहिती असते, तशाच

प्रकारची माहिती या लेखकांस असावी असे वाटल्यावांचून राहत नाहीं. तर हॅ

कशाचें दर्शक असावें ? इतिहासाविषयी आमची जातिवंत प्रवृत्तिच नाही. तेव्हां

या प्रवृत्त्यभावामुळे सामुग्री मिळण्याविषयीं जितकी खटपट व्हावयास पाहिजे

होती तितकी झाली नाही. दुसरें कारण जावजींची स्वतःविषयीं संकोचवृत्ति. यद्यपि

स्वतःचा भाट स्वतःपेक्षां दुसरा कोणी नाहीं ( The arch-flatterer is

one-self ) असे एका प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याचें हाणणें आहे, तथापि जावजी हे या

उक्तीला अपवाद होते. त्यांना स्वतःविषयी बोलण्याचा संकोच व कंटाळा असे.

साधारणतः जगाची प्रवृत्ति ह्मटली ह्मणजे आत्मस्तुतिकरण्याची व करवून घेण्याची

लास मोठी आवड असते. पण जावजींच्या संबंधानें प्रकार अगदी निराळा होता.

'ज्ञानचक्षू' कारांनी आज दोन अडीच वर्षांपासून प्रतिमासास थोर पुरुषांचा जीव-

नवृत्तांत देण्याचा अनुकरणीय व प्रशस्त क्रम धरिला आहे. तेव्हां त्यांस जावजीं