पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




५०    चार चरित्रात्मक लेख.

_____________________________________________________

असे वाटे व ते त्यांस ' वे० शा० सं० रा० रा०' अशा मायन्याची पत्र लिहीत.

त्या परस्थांस जर कोणी हे भंडारी आहेत असे सांगितले तर त्यांस खरे वाटत

नसे; कारण अशा जातींतल्या पुरुषाचे अंगी असले ब्राह्मणी गुण असणें असं-

भाव्य आहे अशी त्यांची दृढ समजूत होती. जेव्हां याच छापखान्यांतून पंचांग

प्रसिद्ध होऊं लागले तेव्हां त्याचें कर्तृत्व गणपतचे प्रियमित्र कै० रा० रखमाजी

देवजी मुळे यांजकडे असे. ते जातीनें व धंद्यानेही शिंपी होते. ते चांगले संस्कृ-

तज्ञ असून ज्योतिषशास्त्र त्यांना चांगले येत असे. तेव्हां ते हें गणपत कृष्णाजीचें

पंचांग तयार करीत. प्रथमतः जेव्हां हें पंचांग प्रसिद्ध होऊं लागले, तेव्हां

मुंबईतील ब्राह्मण मंडळी तें शिंप्याने तयार केलेले पंचांग ह्मणून त्याचा उप-

योग करण्याचा कंटाळा करीत. परंतु स्थल पडलें मुंबई, व राज्य पडलें इंग्रजांचें;

ह्मणून आमची जुन्या समजुतीची मंडळी गप्प बसली. नाहीतर हे पंचांग वर्त-

विणारे ज्योतिषी व त्यांचे पुरस्कर्ते छापखान्याचे मालक यांचे आमच्या कर्मठ

राजांच्या कारकीर्दीत खचित हात कलम केले असते! सारांश खन्या गुणाविका-

साला आमचे इंग्रज राज्यकर्ते त्यांच्या आचारविचारांच्या योगानें अनुकूल अस

ल्या कारणानें ' ख्याति प्राप्तः स्वैर्गुणैरेव धन्यः' असे ज्यांविषयीं ह्मणतां येईल

असे पुरुष आज आमच्यामध्यें निपजूं लागले आहेत. आणि अशाच कोटींतील

आमचे मित्र कै० जावजी हे होत. यांचें अल्पसे चरित्र देण्याचा आमचा विचार

आहे. यांचा व या पुस्तकाचा (वि. ज्ञा. वि. चा ) आज वीस वर्षापेक्षा अधिक दिवसांचा

संबंध आहे. विविधज्ञानविस्तारानें मार्गे आपल्या २१ वर्षीचा इतिहास दिला

आहे त्यांत त्यानें स्वतःस जावजींची किती मदत होती हैं कंठरवाने व प्रांजल-

पणें कबूल केले आहे. 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूला:' हे सर्व उद्योगांचें मूळ बीज

असल्यामुळे, व वि० ज्ञा० विस्ताराचें व या मूळ बीजाचें सटी सहामासी दर्शन

असल्यामुळे या पुस्तकास कवींच गाशा गुंडाळावा लागला असता. दिवाळे

वाजायाला फार तयारी लागत नाहीं. पतीची वेळ असते तेवढी निभावली

ह्मणजे गाडा पुढे सुरळीत चालतो. वि० ज्ञा० विस्ताराची ही वेळ जावजींनीं

पुष्कळ प्रसंगी निभावून नेली व आमरणान्त या पुस्तकावर अकृत्रिम प्रेम

ठेविलें. जावजींच्या या निभावून नेण्याबद्दल व अकृत्रिम प्रेमाबद्दल वि० ज्ञा०

विस्ताराच्यानें उतराई तर होववत नाहींच. तथापि जनरूढीप्रमाणे त्यांचे विषयीं

अल्पसा लेख लिहून आपली कृतज्ञता बुद्धि दर्शविण्याचा हा यत्न आहे.