पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  कै० जावजी दादाजी चौधरी.  ४९

_______________________________________________________________

शिकणारे असे किती आहेत हे कळेल. तर आमचा अनुभवसिद्ध असा ग्रह आहे

कीं, पहिल्या जातीचे शेंकडा दहा पंधरा लोक मिळाल्यास पुष्कळ

झाले. असो. पूर्वकालीं गुणविकासास प्रतिबंधक अशीं इतरही कारणें होतीं.

त्यांपैकी जातिभेदप्राबल्य हें एक जवर होतें. जर रामराज्यासारख्या अवर्णनीय

व सर्वस्तुत कारकीर्दीत देखील शंबुकास तपश्चरणाला प्रतिबंध होत होता, तर

धर्मवेड्या अवरंगझेबाच्या किंवा श्रोत्रिय बाजीरावाच्या कारकीर्दीत जातिभेदा-

मुळे गुणविकासाला किती प्रतिबंध होत असावा याची सहज कल्पना करितां

येईल. आज इंग्रजी राज्यांत हाणजे जातिभेद नाही असें नाहीं. पण तो वेगळ्या

प्रकारचा आहे. तो गुणविकासास प्रतिबंधक नसून उत्तेजक आहे. त्यांच्यांतील

जातिभेद गुणकर्मविभागावरून आहे व अशा प्रकारचा भेद हा सदैव राहायाचाच.

हा निरुपद्रवी व गुणकारी भेद जातिभेद या नांवानें व्यवहार्य असावा किंवा कसें

याचा विचार करण्याचें प्रस्तुत स्थल नाहीं व प्रसंगही नाहीं. अस्तु. अशा या

कारणांमुळे आमचे इकडे गुणविकासास जसा मिळावा तसा वाव मिळाला

नाहीं. तो वाव आज आह्मांस इंग्रज राज्यकर्त्यांच्या योगानें प्राप्त झाला आहे.

स्वतःच्या गुणांमुळे मनुष्यास आज उदयास येण्यास प्रतिबंध नाही इतकेंच नव्हे

पण आनुकूल्यही प्राप्त झाले आहे. मदालसाचंपूकारांनीं वर्णिलेली तिसरी व चौथी

कोटी यापुढे सुलभ झाली आहे; मात्र स्वतः प्रयत्न करून आपल्या अंगचे गुण

दाखविण्याची खटपट मनुष्याने केली पाहिजे.


 आमच्या सुदैवानें जर हें गुणविकासास कालानुकूल्य इंग्रजांच्या राज्या-

नें प्राप्त झालें नसतें, तर आज ज्या कांहीं व्यक्ति त्यांच्या केवळ गुणांमुळे उदया-

स आल्या आहेत व आमच्या सप्रेम आदरास पात्र झाल्या आहेत, त्या व्यक्ति

झाल्या किंवा न झाल्या अशासारख्या झाल्या असत्या. आज आमच्या महा-

राष्ट्रभाषेचें पाणिनित्व जे एका (लौकिक समजुतीप्रमाणें ) हीन-जातीयाला मि-

ळाले आहे तें पूर्वीच्या कर्मठ व धर्मवेड्या राजकारकीर्दीत तशा जातीतील पुरु-

षला मिळाले असते का? कै० गणपत कृष्णाजी हे जातीचे भंडारी होत हें सुप्रसि

द्ध आहे. त्यांनीं व त्यांच्या वंशजांनी भागवत, रामायण, भारत इत्यादि प्रचंड

संस्कृत ग्रंथ, व हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप वगैरे प्राकृत ग्रंथ, फार शुद्ध

उत्तम रीतीनें जेव्हां छापून प्रसिद्ध केले, व तेही अगदीं अवेलीस, तेव्हां मुंबई-

च्या बाह्यप्रदेशीय लोकांस हे छापखान्याचे मालक ब्राह्मणच असले पाहिजेत

.