पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




४८   चार चरित्रात्मक लेख.

_______________________________________________________

आहे व तसें कालानुकूल्य पूर्वी नव्हते. पूर्वी कांहीं कांही प्रसंगी क्षात्रगुणविका-

साला आमच्या या देशांत अवसर सांपडला आहे असें जो त्रोटकसा पूर्व इति-

हास आज उपलब्ध आहे त्यावरून अनुमान करण्यास जागा आहे. बाकी इतर

प्रकारच्या गुणविकासास जातिभेदादि दुरतिक्रम कारणांमुळे कालानुकूल्य नव्हतें

असें निरभिमानतया कबूल करावें लागतें. तो प्रकार आतां आमच्या इकडे

बराच कमी झाला आहे किंवा उरला नाहीं. त्या योगानें आतां ' गुणा: पूजा-

स्थानं गुणिषु नच लिंगं न च वयः ' हा प्रकार आमच्या इकडे विचार करील

त्याला सर्वत्र दिसूं लागला आहे, आतां हे कोण ? राजशालक, हे कोण ? मामासा-

हेब, हे कोण ? थोरल्या ताईसाहेबांचे वडील, अशासारखीं नातीं जहागिरी मिळवि-

ण्यास व नांवालौकिकास चढण्यास अगदीं निरुपयोगी झाली आहेत. पूर्वी ह्मणजे

अशा मंडळीस खरा मान मिळत होता असा प्रकार मुळीच नाहीं. परन्तु ही

मंडळी खऱ्या गुणी पुरुषांच्या गुणविकासाला प्रतिबंधक होत होती. त्यामुळे

' जीर्णमंगे सुभाषितम् ' अशी गत सर्व गुणांची होत असे. आतां हा प्रकार

आमच्या हिंदूच्या राज्यांतच होता असें ह्मणण्याचा आमचा उद्देश नसून मुसल

मान राजांचे कारकीर्दीतही हाच प्रकार होता. ह्मणजे राजांस किंवा राजाधि-

कृतांस खचा गुणांची चीज करतां येत नसे, किंवा त्यांस संधि मिळत नसे.

व एकंदर राज्याधिकारपद्धतीच्या धोरणानें पाहतां या गुणिजनांस पुढे सरकण्यास

रीघच नसे. तेव्हां पूर्वकाळीं गुणविकास होण्यास आनुकूल्य मिळत नसे. आमचे-

कडे गुणविकासप्रतिबंधक असें दुसरें एक जबरदस्त कारण ह्मटले ह्मणजे आमचा

- ह्मणजे हिंदु व मुसलमान यांचा दायभाग प्रकार हा होय. या दायभागाच्या

पद्धतीनें आह्यांमध्ये अत्यंत आलस्य व मांद्य ही उत्पन्न केली. या आळसाने व

महा आमचें किती नुकसान केलें आहे याची गणतीही करता यावयाची

नाहीं. जरी आह्मांस हे इंग्रज राज्यकर्ते मिळाले आहेत व जरी आह्मांस स्वतःच्या

प्रयत्नाचा कित्ता ते सर्वप्रकारें नित्यशः घालून देत आहेत, तरी या दायभाग-

पद्धतीमुळे आमचें आज अतोनात नुकसान होत आहे. याचा थोडक्यांत मासला

पहायाचा असल्यास आमच्या युनिव्हर्सिट्यांचीं क्यालेंडरें घेऊन पहा कीं इतके

ग्र्याजुएट व अंडरम्याजुएट लोकांपैकी शेकडा घरचे खाऊन पिऊन चांगले सुखी

असे किती आहेत ? व माधुकरी, वारकरी, दुसऱ्यांचे आश्रयाने किंवा कर्ज घेऊन