पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चार चरित्रात्मक लेख. आहे व तसे कालानुकूल्य पूर्वी नव्हते. पूर्वी काही काही प्रसंगी क्षात्रगुणविकासाला आमच्या या देशांत अवसर सांपडला आहे असें जो त्रोटकसा पूर्व इतिहास आज उपलब्ध आहे त्यावरून अनुमान करण्यास जागा आहे. बाकी इतर प्रकारच्या गुणविकासास जातिभेदादि दुरतिक्रम कारणांमुळे कालानुकूल्य नव्हतें असें निरभिमानतया कबूल करावे लागते. तो प्रकार आतां आमच्या इकडे बराच कमी झाला आहे किंवा उरला नाही. त्या योगाने आतां 'गुणा: पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः' हा प्रकार आमच्या इकडे विचार करील व्याला सर्वत्र दिसू लागला आहे, आतां हे कोण ? राजशालक, हे कोण ? मामासाहेब, हे कोण ? थोरल्या ताईसाहेबांचे वडील, अशासारखी नाती जहागिरी मिळविण्यास व नांवालौकिकास चढण्यास अगदी निरुपयोगी झाली आहेत. पूर्वी ह्मणजे अशा मंडळीस खरा मान मिळत होता असा प्रकार मुळीच नाही. परन्तु ही मंडळी खऱ्या गुणी पुरुषांच्या गुणविकासाला प्रतिबंधक होत होती. त्यामुळे जीर्णमंगे सुभाषितम् ' अशी गत सर्व गुणांची होत असे. आता हा प्रकार आमच्या हिंदूंच्या राज्यांतच होता असें ह्मणण्याचा आमचा उद्देश नसून मुसलमान राजांचे कारकीर्दीतही हाच प्रकार होता. ह्मणजे राजांस किंवा राजाधि नास खऱ्या गुणांची चीज करतां येत नसे, किंवा त्यांस संधि मिळत नसे. व एकंदर राज्याधिकारपद्धतीच्या धोरणाने पाहतां या गुणिजनांस पुढे सरकण्यास रीघच नसे. तेव्हां पूर्वकाळी गुणविकास होण्यास आनुकूल्य मिळत नसे. आमचेकडे गुणविकासप्रतिबंधक असें दुसरें एक जबरदस्त कारण झटले ह्मणजे आमचा -ह्मणजे हिंदु व मुसलमान यांचा-दायभाग प्रकार हा होय. या दायभागाच्या पद्धतीने आह्मांमध्ये अत्यंत आलस्य व मांद्य ही उत्पन्न केली. या आळसाने व मपणाने आमचे किती नुकसान केले आहे याची गणतीही करता यावयाची नाही जरी आमांस हे इंग्रज राज्यकर्ते मिळाले आहेत व जरी आमांस स्वत:च्या मनाचा कित्ता ते सर्वप्रकारे नित्यशः घालून देत आहेत, तरी या दायभागपद्धतीमुळे आमचे आज अतोनात नुकसान होत आहे. याचा थोडक्यांत मासला पहायाचा असल्यास आमच्या युनिव्हर्सिट्यांची क्यालेंडर घेऊन पहा की इतके ग्रयाजुएट व अंडरग्र्याजुएट लोकांपैकी शेकडा घरचे खाऊन पिऊन चांगले सुखी असे किती आहेत? व माधुकरी, वारकरी, दुसऱ्यांचे आश्रयाने किंवा कर्ज घेऊन