पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





  कै० जावजी दादाजी चौधरी.  ४७

_____________________________________________________________

होते हें सर्वानुभूतच आहे. अगदी परक्याचे गुणांवरून एकाद्याची खरी कदर

तर होणें नाहींच; पण स्वकीय मंडळीच्या योगानें ज्याची प्रख्याती होते अशा

लोकांच्या प्रख्यातीचे व योग्यतेचे दर्जे या जगांतील अनुभवानें समंजस

लोक लावतात, व तशाच प्रकारें सदरील उद्धृत वाक्यांत कवीनें लावले आहेत.

 आज ज्याप्रमाणे स्वतःच्या प्रयत्नानें मनुष्यास पुढे येण्यास सुयोग आहेत

त्याप्रमाणे आमच्या इकडील पूर्वराजांचे काळी नव्हते. आमचें इंग्रज सरकार स्वत:

प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांचे सर्व आचार विचार प्रयत्नवादित्वाचे धोरणाचे

असतात. त्यांचा सर्व इतिहास अव्वलपासून तो आजवरपर्यंतचा, खुद्द त्यांचे

देशांतील ह्मणा किंवा ज्या ज्या ठिकाणीं इंग्रज लोकांचा संबंध पोचत आहे

त्या त्या ठिकाणींचा ह्मणा, या प्रयत्नवादित्वाची पूर्ण साक्ष भरीत आहे. "सांगे

वडिलांची कीर्ति | तो एक मूर्ख जाणावा " हे तत्त्व त्या लोकांस नुसतें आम

च्याप्रमाणे मान्य आहे इतकेच नव्हे पण तें त्यांच्या कृतीत देखील ठळक

उमटलेले दिसतें. ' बड़े बापका बेटा' हा प्रकार त्यांच्या तिकडे फारच कमी-

किंबहुना नाहींच असें ह्मटल्यास चालेल. त्यांची गृहस्थिति व त्यांचा दायभाग

हींही स्वतःप्रयत्नाला अत्यंत पोषक आहेत. त्याचप्रमाणे ' चातुर्वर्ण्य मया

सृष्टं गुणकर्मविभागशः ’ हें जें खरें, उन्नत व उदार तत्त्व हे केवळ भगवद्गीतेंत

राहून पाठोपयोगी होण्याचें नसून त्या लोकांच्या प्रत्यहीं व्यवहरांत जागरूकतया

दृष्टोत्पत्तीस येतें. तेव्हां अशा लोकांचा आमच्याशी संबंध असणे ईश्वरास मंजूर

असल्यामुळे तो संबंध आजकाल जुळून आला आहे. व त्या संबंधाचे मागून

येणारी जी कांहीं बरी वाईट स्थिति यावयाची तीही आह्मांस प्राप्त झाली आहे.

आतां मनुष्याला केवळ आपल्या अंगच्या किंवा संपादित गुणांमुळे जगापुढे

येण्यास सांपडतें, हा सुयोग त्या बच्या स्थितीतील मुख्य अंग होय.

 आमचे इंग्रज राज्यकर्ते आह्मांस लाभतपर्यंत हा सुयोग आमचे पूर्वीचे

राज्यकर्त्यांचे कारकीर्दीत इकडील लोकांस फारच कमी होता, किंवा नव्हता

असें ह्मणण्यासही फारसा प्रत्यवाय नाहीं. कदाचित् तसा पूर्वी सुयोग असल्यास

तो इतिहासाभावामुळे आह्मांस जसा दिसावा तसा दिसत नसेल. कोणतेही

कारण असो, पण आज तरी तसा सुयोग पूर्वी होता असें ह्मणणें जरा विचाराचेंच

आहे असें कबूल करावें लागतें. खऱ्या गुणविकासाला कालानुकूल्य अवश्य