पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.  ४५

_______________________________________________________________________

 परंतु वेदान्त दुसऱ्यास सांगणें जितके सोपें आहे, तसे आपल्या स्वतःला सांगणें

सोपें असतें व तसे वागणेही जर सुकर असतें, तर काय बहार उडती ! उपदेश

सुलभ यांत शंका नाहीं. रा. लेले यांस आह्मी उपदेश केला खरा, परंतु विविधज्ञान-

विस्ताराची मोडकांच्या चिरंतन वियोगामुळे नसतां धुरंधर वृषभ बालवृष भरें

करून आ वांके' अशी जी स्थिति झाली व जें त्यास दुःख झालें आहे त्याच्या

परिहारार्थ आह्मांस कांहींच उपाय सुचत नाहीं असे झाले आहे. असो. असा

बहुगुणमय पुरुष मृत्युमुखी पडल्याने आमचें ह्मणजे महाराष्ट्र लोकांचें व भाषेचें

अपरिहार्य नुकसान झाले आहे. तें भरून येण्याचें आज तरी साधन दिसत

नाहीं. ईश्वर त्यांचे आत्म्यास चिरंतन शान्तिसौख्य देवो !