पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





   कै० जावजी दादाजी चौधरी.

















जन्म - सन १८३८- ३९.  मृत्यु - ता. ५ एप्रील सन १८९२.


 ज्ञातो मात्रा मातृपक्षैर्निकृष्टः । पित्रा लोके ज्ञायते मध्यमस्तु ॥

 ख्यातिं प्राप्तः स्वैर्गुणैरेव धन्यः । पुत्रैर्वित्तः कोपि पुण्याधिकेषु ॥


सदरील मदालसाचंपूकाराची उक्ति कोणास मानवत नाहीं? सर्व विचारी लो-

कांना स्वत:च्या प्रयत्नानें नांवालौकिकास चढणें अत्यंत इष्ट वाटतें; व जे तसे मो-

ठेपणास, योग्यतेस व लोकादरास पात्र झाले आहेत, होत आहेत व होतील, ते

सर्व त्यांस अत्यंत प्रियकोटींतील वाटतात हे सर्वतोपरी युक्त आहे. अर्थात् जे

दुसऱ्याचे गुणांवरून प्रख्यातसि आलेले असतात त्यांची कदर तितक्याच मानानें