पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४४  चार चरित्रात्मक लेख.

__________________________________________________________________

उलट होता. त्यांचें धोरण आपली प्रतिष्ठा वाढवावी हे नव्हते. 'शाहाणे करून

सोडावें बहुत जनां' हैं ज्या योगानें साधेल तें त्यांचें धोरण असे, ह्मणूनच त्यांनीं

पुष्कळ होतकरू लोकांस हातीं धरून त्यांचे करवीं या त्यांच्या इष्टकार्यास जें

साहाय्य झालें तें करवून घेतले. 'काव्येतिहाससंग्रह' मासिकपुस्तक स्वतंत्र काढ-

ण्याचे पूर्वी त्यांचा असा विचार होता की, विविधज्ञानविस्ताराचा निम्मा भाग

काव्येतिहासाला द्यावा व निम्मा भाग त्याच्या इतर विषयार्थ खर्च करावा.

परंतु तसें करण्यास विविधज्ञानविस्तारास सवड नव्हती, ह्मणून त्यांनी तें स्वतंत्र

पुस्तक काढिले. त्यांचा विचार - कसा का होईना - महाराष्ट्र भाषेंत काव्येतिहासाचा

संग्रह व्हावा इतकाच होता. स्वत:चा टेंभा मिरवावा हे त्यांच्या स्वप्नींही नव्हते.

पुढे काव्यमाला निघायाला लागण्यावरावर आपल्या पुस्तकांतील संस्कृत

भाग अजी बंद करून दिला. जोंवर विष्णुशास्त्री चिपळुणकर संस्कृत भागाचे

संपादक होते तोंवर त्यांनीं नुसत्या मराठी काव्याचें काम आपणाकडे ठेविलें

होतें. परंतु तें करण्यास दुसरा कोणी योग्य पुरुष तयार असता तर त्यांनीं

त्याची माळ आनंदानें त्याच्या गळ्यांत घातली असती. बरें, जेव्हां दोन्हीं कामें

करण्याचें गळी पडले तेव्हांही त्यांनी कुरकुर केली नाहीं. असो. हा जो विद्वान्

लोकांत कमी आढळणारा निर्मत्सर गुण तो यांच्या अंगीं चांगला बाणला होता.

त्याचें पूर्णपणे अनुकरण करावें असें प्रेमपूर्वक विद्वान् मंडळीस आमचे सुच-

विणे आहे.

 जनार्दनपंत स्वत: कवि होते किंवा नाहीं हें आह्मांस माहित नाहीं. परंतु

ते उत्कृष्ट रसिक होते ही गोष्ट निर्विवाद आहे. कवितेचा भोक्ता रसिक होण्यास

मनुष्यानें स्वतः कवि असलेच पाहिजे असे नाही. एका जुन्या कवीचें यासंबंधानें

असें ह्मणणें आहे कीं “कविः करोति काव्यानि रसं जानाति पंडितः”

 जनार्दनपंत हे चांगले ज्योतिषी झाले होते, व हे व रा. रा. विसाजी रघुनाथ लेले,

व रा.रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित या तिघांनी सायनसरण्युद्धारार्थ जे यत्न केले आहेत

त्यायोगानें सर्व लोकांवर त्यांचे स्मरणीय उपकार झाले आहेत. या सत्पक्षपाती

त्रिकूटापैकी काळानें एक कूट तर सर केले. त्या योगानें एक प्रचंड आधारच

-खचला असें ह्यटले तरी चालेल. परंतु लेल्यांसारखे धैर्यनग या कूटप्रपातामुळे

खचलेसे दाखविणार नाहीत असे आह्मी इच्छितों.