पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै०जनार्दन बाळाजी मोडक,बी.ए.  ४३

_______________________________________________________________

परित्याग होतां होई तो करायाचा नाहीं हा जो त्यांचा बाणा तो त्यांनी आमरण

राखला. विविधज्ञानविस्ताराला त्यांनी आपलेसें ह्मटलें होतें त्याचा निर्वाह

त्यांनी अखेरपर्यंत, ह्मणजे देहावसानाच्या पूर्वी सहा दिवसपर्यंत, एकसारखा केला

आणि खरोखर त्या सहा दिवसांत जर त्यांस शक्ति असती तर खात्री आहे

कीं गेल्या अंकांतील जोशीबोवांच्या शंकांना उत्तर खास आलें असतें. आज

त्यांच्या हातचा शेवटचा लेख वाचकांना सादर करून, मोडकांच्या या अखेरच्या

उपकृतीबद्दल कृतज्ञता दाखवून, त्यांच्या ह्या निरपेक्ष अध्यापनाविषयींचें

आमचें ह्मणणें आटपतों.

 मोडक हे मोठे विद्वान् होते ह्मणून सांगण्याची जरी जरूरी नाहीं, तरी बऱ्याच

विद्वानांत जो मोठा दोष आढळतो तो त्यांच्यांत नव्हता हे सांगणे अवश्य आहे.

विद्वान् लोकांत कमी ज्यास्ती मानानें जो मत्सर आढळतो त्याचा गंधही मोडकांत न-

व्हता, असे ज्यांना ह्मणून मोडकांची थोडी बहुत माहिती आहे त्यांस ठाऊक

आहे. 'विद्वांस मत्सरप्रस्ताः' असा शेरा भर्तृहरीच्या वेळापासून चाललेला आहे,

व तो बहुतेक अंशीं तसाच चालला आहे व चालेल. परंतु जनार्दनपंतांनीं त्या

दोशाला आपल्याजवळ कधीं येऊं दिलें नाहीं. ते धुतलेल्या तांदुळासारखे या

दोषापासून अगदर्दी अलिप्त राहिले. पुष्कळांना परोत्कर्ष अगदी सहन होत नाहीं

व आपलाच जिकडे तिकडे टेंभा मिरवावा असे वाटत असते व त्याकरतां

त्यांचे सतत प्रयत्न चालले असतात. परंतु जनार्दनपंतांचा प्रकार याच्या अगदी

_________________________________________________________

  • वि. ज्ञा. वि. पु० २२ अं. ४

+ ते पत्रही आह्मांकडे मोडकांमार्फतच आलें होतें. या गोष्टीवरून ते मनाचे किती

मोकळे होते व त्यांस दुराग्रह नव्हता याची चांगली साक्ष पटते. हर ! हर ! काय

या मनुष्यदेहाची क्षणभंगुरता तरी, की त्या पत्राचें उत्तर देण्याची त्यांची तयारी

असतांही त्यांस तसे करण्यास वेळ सांपडूं नये !

+ हा लेख लिहून झाल्यावर मोडकांनी विविधज्ञानविस्ताराकरितां मुद्दाम तयार

करून ठेविलेले दुसरे दोन विषय त्यांच्या आप्तांकडून आमच्या एका हितचिंतक

मित्राने मोठया खटपटीने मिळवून आणिले आहेत. शिवाय त्यानें मोडकांनी केलेली

मराठी कविताहीं संपादन केली आहे. हे त्या मित्राचे आम्हांवर उपकार आहेत. हे

लेख व कविता लवकरच या पुस्तकांत प्रसिद्ध करण्यांत येतील.