पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४२  चार चरित्रात्मक लेख.

याचें सहज अनुमान करतां येईल. रामजोशांच्या लावण्या व बरेच पोवाडे जे

विविधज्ञानविस्तारांत प्रसिद्ध झाले आहेत, ते देखील यांच्याच कडून आले होते.

आमचे मित्र या पुस्तकाला स्वतःच्या लेखांनी व संग्रहीत केलेल्या जुन्या

लेखांनी साहाय्य करून स्वस्थ राहिले नाहीत; परंतु आपल्या इष्टमित्रांना उत्ते-

जन देऊन त्यांजकडून लेख लिहवून या पुस्तकांत प्रविष्ट करण्याकरितां ते पाठवीत

असत. याला एकच उदाहरण पुरे आहे. 'भामिनीविलास' ग्रंथाचें जें पद्यबद्ध

भाषांतर या पुस्तकांत प्रसिद्ध झाले आहे, तें जनार्दनपंतांच्या एका शिष्यानें

त्यांच्या उत्तेजनानेंच तयार केलें, व आमच्याकडे त्यांचे मार्फतच आलें. आतां या

भाषांतरावरून तें करणारास कवित्वशक्ति चांगली आहे असे स्पष्ट कळून येतें.

परंतु या भाषांतराव्यतिरिच आजवर या गृहस्थाची करिता कोठे दृष्टीस पदंडी

नाहीं, याचे कारण आमच्या बुद्धीस तर असे वाटते की या गुरुशिष्यांचें सांनिध्य

सुटले व जितके या शिष्यास प्रोत्साहन पाहिजे होते तितकें मिळणें कमी झाले.

जनार्दनपंतांसारखे तेजस्वी पुरुष है या विद्वन्मंडळांतील सूर्य होत व आमच्या

या भाषांतरकार मित्रासारखे पुरुष हे धूमकेतु होत असें म्हणावें लागतें. ज्या-

प्रमाणें सूर्यांची संख्या धूमकेतूंच्या मानाने फार कमी, तसेच जनार्दंपतांसारखे

उत्तेजक पुरुषही फार कमी. जेव्हां धूमकेतु सूर्याचे संनिकट येतात, तेव्हां त्यांस

त्यापासून तेज प्राप्त होऊन ते झळकूं लागतात व आपण कोणी आहो असे

नभोमंडळांस दाखवूं लागतात. परंतु ते जर कालगतीनें सूर्यापासून दूरवर्ती झाले

तर ते तेजोहीन होऊन दिसतनासे होतात. हाच प्रकार जनार्दनपंतांसारख्या

विद्वत्सूर्याचे सांनिघ्य किंवा दूरत्व यांपासून झालेला दृष्टीस पडत आला. आतां

तर या तेजःपुंज सूर्याचा चिरंतन अस्त झाला तेव्हां त्याच्या मंडलांतील किती

धूमकेतु आतां निस्तेज व फिके होतील हे सांगणे फार कठिण आहे. विविधज्ञान-

विस्तार हा या संबंधानें नभोमंडलरूप आहे हे सांगणें नको. आतां या सूर्यास्ता-

मुळें तेथें अंधकार पडण्याची भीति आहे. परंतु पूर्णचंद्राचा त्याला आश्रय अस-

ल्यामुळे तें जितकें एरवीं भयानक दिसलें असतें तितकें दिसणार नाहीं ही एक

दु:खांत सुखाची गोष्ट आहे. असो. जनार्दनपंतांचे विविधज्ञानविस्तारावर जे

उपकार आहेत ते लिहून पुरणार नाहींत इतके अतोनात आहेत. अंगीकृताचा

___________________________________________________________________

  • कै० लक्ष्मण रामचंद्र वैद्य, एम्, ए. एल. एल. बी.