पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



   कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.}  ४१

__________________________________________________________________

माला व निबंधचंद्रिका यांतील त्यांचे लेख त्यांच्या सहीनिशीं प्रसिद्ध झाले अस

ल्याकारणाने ते अमुक ह्मणून पुनः येथे सांगण्याची जरूरी नाहीं. आमचा असा

अंदाज आहे की, माजी 'शाळापत्रकांत' महाराष्ट्र कवितेच्या संबंधानें यांच्या हा-

तचीं कांहीं शंकासमाधानें असावीत, परंतु याचा पत्ता नीट लागणे कठिण. 'काव्य-

रत्नावली'कारांनी यांस एक काव्यपरीक्षक नेमलें होतें. त्यासंबंधानें ते पुस्तककार

जें योग्य असेल तें लिहितीलच. इतके ठिकाणी हे लेख लिहीत होते तेव्हां यांचा

उद्योग, यांचा व्यासंग व यांचें परिशीलन हीं किती वर्णनीय होतीं याची अटकळ

वाचकांनीच करावी. शिवाय हेही पण लक्षांत ठेविले पाहिजे की यांचे हे लेख

बातमीदारांच्या पत्रांच्या किंवा शिळोप्याच्या गप्पांच्या जातीचे नव्हते; इतकेंच

नाहीं, परंतु ज्या वर्तमानपत्रांतून व मासिकपुस्तकांतून ते लेख प्रसिद्ध झाले,

त्यांतील मुख्य संपादकाच्या चांगल्या चांगल्या लेखांना सुद्धां ते निस्तेज करून

सोडीत व खाली पहायास लावीत. हे त्यांचे सर्व लेख एकत्र करून छापविले

असतां तो संग्रह अत्यंत मोलाचा उपयोगाचा व अध्ययन करण्यालायक

होईल. हे काम कोणी त्यांच्या घरोब्याच्या मित्रानें पत्करिलें पाहिजे. विविध-

ज्ञानविस्तारांत मोडक यांचे जे लेख आजवर आले त्यांची यादी खाली दिली

आहे, तीवरून त्यांचे आवडते विषय कोणते होते व लेखविस्तार केवढा आहे

___________________________________________________________

  • पुराणग्रंथ; मंगल ग्रहाचे चंद्र; लघु ग्रह; बुध ग्रहावर जीवजंतु आहेत काय ?;

नवीन ग्रह; लीलावती; काशी येथील संवत् १९३६ । ३७ । ३८ | ३९ | ४० व ४१

च्या तिथिपत्रांवर अभिप्राय: कालमापन; लघु आर्यसिद्धांत; कळंबी गांवीं आकाशांतून

पडलेला दगड; क्षेत्रशंकुच्छेदावरील पुस्तकपरीक्षा; चिंतामणि रघुनाथाचार्य ज्योतिषी;

नवीन शोध; पत्रांस उत्तरें; ग्रहर्णे; वराहमिहिराचा काळ; आर्यकालगणना; रफुटवक्ता

अभियोगी; फलज्योतिष; चंद्रिका हाणजे चांदणें; धूमकेतु; धूत; कळंबी गांवीं पडलेल्या

दगडाचें पृथक्करण; आर्यभट्ट; रा. ब. केरो लक्ष्मण छत्रे; कविचरित्र - श्रीहर्ष, बाण,

भवभूति, माघ, सातवाहन, बिल्हण, जगन्नाथपंडितराय, राजशेखर, रुद्रट, क्षेमेंद्र,

मंखक, गोवर्धनाचार्य, अलंकारशास्त्रकार, मम्मट; पंचांग, विविधग्रंथसंग्रहपुस्तकावरील

अभिप्राय; ज्योतिषी कमलाकर भट्ट; मेघदूतावेष्टित पार्श्वाभ्युदय काव्य; एक नूतन उप-

लब्ध ६५० वर्षांपूर्वीचें काव्य; भडोच येथील गुर्जर राजांचें प्राचीन राज्य; व्यासकृत '

महाभारतांत परस्परविरोधी असे दोन लेख; रामजोशाच्या लावण्या; पत्रें व पोबाडे.