पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४०    चार चरित्रात्मक लेख.

_________________________________________________________

_

झालेलें नसतें. यामुळे त्यास प्रेम, औदार्य व परोपकारबुद्धि हीं प्रेरक

असतात व म्हणूनच तें रमणीय व प्रिय असें होतें. अध्यापक चांगला व योग्य

असला पाहिजे हैं तत्त्व गृहीत आहे हें मात्र विसरता कामा नये. मोडकांनी बहुत

जनांस ज्या गोष्टी माहित असण्याचा संभव कमी, पण ज्या त्यांस ठाऊक होत्या

त्या लोकांकरितां सुलभ करून ठेविल्या आहेत व समर्थांचा उपदेश- 'जितुकें कांहीं

आपणांस ठावें, तितुकें हळू हळू शिकवावें, शहाणे करूनी सोडावें, बहुत जना, ' -

आपल्या कृतीनें शब्दशः सार्थ करून दाखविला. आतां निरपेक्ष अध्यापन करणारे

काय ते जनार्दनपंत एकटेच निपजले, अर्से आमचे मुळींच झणणे नाही. परंतु जे

कोणी या जातीचे असतील त्यांतील हे वरिष्ट प्रतीचे होते असे आह्मी ह्मणतों

व याला पुष्कळांचा रुकार मिळेल असे आह्मांस वाटतें.

 आतां जनार्दनपंतांनीं या निरपेक्ष प्रकारचें अध्यापन कोठें कोठें व कोणत्या

साधनांनी केले याचे थोडक्यांत कथन करून हा वाढत चाललेला लेख संपवितों.

प्रथमत: यांनी स्वतंत्र ग्रंथ रचून अध्यापन करण्याचें साधन केलें. त्यांनी तीन

चार ग्रंथ रचले आहेत व ते प्रसिद्धही झाले आहेत व त्यांतील कांहींविषयीं अभिप्राय

या पुस्तकांत पूर्वी आलेच आहेत. त्यांनी दोन एक ग्रंथ रचून ठेविले आहेत; पण

ते प्रसिद्ध व्हावयाचे आहेत. दुसरा प्रकार वर्तमानपत्रे व मासिक पुस्तकें यांचे द्वारे यांनी

निरनिराळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध करून 'बहुत जनां शहाणे करून सोडण्याचा'

यत्न केला. या प्रकाराची साद्यंत माहिती आह्मांजवळ नाहीं; व असती तरी स्थळ

व काळ यांचा अभाव असल्यामुळे विविधज्ञानविस्तारद्वारें जे त्यांचे लेख प्रसिद्ध

झाले त्यांविषयीं मात्र दोन शब्द लिहितों, बालबोध, अरुणोदय, इत्यादिकांच्या

द्वारे त्यांचे जे लेख प्रसिद्ध झाले होते त्याविषय उल्लेख केलाच आहे. काव्ये-

तिहाससंग्रह व काव्यसंग्रह ही दोन तर त्यांच्या अध्यापनश्रमाचीं चांगलीं स्मा-

रकें* आहेत. तेव्हां त्याविषयीं परक्यानें विशेष लिहिण्याचे कारण नाहीं. निबंध-

____________________________________________________________

  • एकाविषयी पुष्कळदा आमचा अभिप्राय येऊन चुकला आहे व दुसऱ्याविषयीं

लवकरच येईल. तूर्त रा०रा० जावजी दादाजी यांचें गुणग्राहित्व व युक्तकरिता यांचें

ओघाने आले ह्मणून अभिनंदन करतों. “ कै० जनार्दन बाळाजी मोडक यांचें स्मा•

रक " हे शब्द काव्यसंग्रहाचे मुखपृष्टावर घातल्यानें गुणी व गुणज्ञ या दोघांसही

मोठे भूषणीय आहेत.