पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.   ३९

कामांत खर्ची पडली. हे उत्कृष्ट शिक्षक होते. यांना मदड मुलालाही सतेज कर-

ण्याचा तोडगा साधला होता असें ह्मणतात. सगळ्यांनाच शिक्षकपणाची हातोटी

साधते असे नाहीं. शिक्षकाला जितके ह्मणून गुण पाहिजेत तितके मोडकांच्या

अंगीं होते, असे बळकट अनुमान त्यांची 'उत्कृष्ट शिक्षक' ह्मणून सर्वतोमुखीं

जी स्तुति ऐकायास येते तिजवरून काढतां येतें. तसेच त्यांच्या अनेक लेखांच्या

बालबोध सरणीवरूनही याच गोष्टीचें पक्के अनुमान करतां येतें.

 मोडकांचें एकंदर आयुध्य अध्ययन व अध्यापन यांमध्ये गेले. यांचें अध्या-

पनाचें काम दोन प्रकारचें होतें. एक सापेक्ष व दुसरें निरपेक्ष. दोन्ही प्रकारचें

अध्यापन यांनी मोठ्या मनोभावानें व आस्थापूर्वक केलें. सापेक्ष अध्यापन ज्यांना

करण्याचें वृत्तिसंबंधानें भाग पडले आहे त्यांपैकी बहुतेक तें काम आपल्या इमा

नाला जागून करीत असतात. जे आपल्या कामाची टंगळमंगळ करतात, त्यांना

यश येत नाहीं, व ते कामचोर गणले जातात. ह्मणून वास्तविक त्यांस हरामखोर

असें म्हटले असतां चालेल. परंतु जे लोक आपलें काम-ह्मणजे ज्याबद्दल मुषाहिरा

मिळत आहे, असें काम नीट आस्थापूर्वक करितात ते आपले कर्तव्य करितात

असें ह्वाटलें पाहिजे, व त्याबद्दल त्यांची विशेष तारीफ नको. परंतु ज्यांनी आपली

सापेक्ष व निरपेक्ष अशी दोन्ही प्रकारची कामे मोठ्या चोख रीतीनें, सचोटीनें,

आस्थेनें व कळकळीनें केली त्यांची कितीही तारीफ केली तरी थोडीच. अशा

कोटीतील आमचे मित्र जनार्दनपंत असून त्यांतल्या त्यांत वरच्या पायरीचे

होते. त्यांचे सापेक्ष अध्यापनाचा लाभ त्यांच्या परिमितसंख्य अन्तेवासायांस

झाला; व तो देखील उत्तम प्रतीचा व पुष्कळ असा झाला आहे, असे त्यांचे

शिष्य मोठ्या प्रेमानें व कृतज्ञताबुद्धिपूर्वक कबूल करतात. तथापि त्यांच्या निर

पेक्ष अध्यापनाचा लाभ किती लोकांना झाला आहे त्यांची संख्या सांगणे फारच

कठिण जाईल. व यद्यपि जनार्दनपंत गेले, तथापि त्यांनी लोकांचे अध्यापनार्थ जे

सुगम धडे घालून दिले आहेत ते ' अक्षरसंबद्ध' असल्यामुळे कित्येक युगांचीं

युगें टिकतील व त्यांचा लाभ असंख्यात शिष्यवर्गास होईल. एकापासूनचा लाभ

केवळ मितकालीन व मितसंख्य होता, परंतु या दुसऱ्यापासूनचा लाभ अमित-

कालीन व अमितसंख्य असा आहे, हे महदंतर लक्षांत बाळगण्याजोगे आहे.

शिवाय ह्या निरपेक्ष अध्यापनाचें काम कोणाच्या जुलुमामुळे, भीतीमुळे किंवा