पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



'३८   चार चरित्रात्मक लेख.

नाहींत. मात्र त्या काळाचे मानानें अध्ययनाचा खर्च वाढत आहे, व शिकणा-

रांची संख्या वाढत चाललेली असून स्कालरशिप्स वगैरेंची अध्ययनोत्तेजक

साधनें जितक्याची तितकींच राहिलीं आहेत, किंबहुना कमी होत चालली

आहेत. त्यामुळे आज ज्या विद्यार्थ्यास घरची मदत नाहीं, पण ज्यांनी अध्य-

यनक्रम चालू ठेविला आहे त्यांची तारीफ करणें रास्त होईल. पण जनार्दन

पंतांनी आपल्या कमाईवर आपले अध्ययन केले यांत विशेष तारिफीचा प्रकार

कांही नाहीं, कारण त्यांच्या बहुतेक सहाध्यायांचीही तीच स्थिति होती असें

थोडेंसें मागें पाहिलें ह्मणजे लक्षांत येईल. त्यांतून जनार्दनपंतांच्या वडिलांची

स्थितिही विशेष चांगली असेल असे वाटत नाहीं. कारण जर स्थिति चांगली

असती तर ते पेन्शन घेतल्यावर कोल्हापुर संस्थानांत महाफिझ दफ्तरच्या

कामावर राहिले नसते. त्याशिवाय जनार्दनपंत पहिल्या कुटुंबाचे असल्यामुळे

वडिलांचा त्यांजकडे ओढा कदाचित् कमी असेल. कसेंही असो, मामलतदाराचे

आपण चिरंजीव आहों, आपणांस शिकून काय करायाचें आहे, अशा पोकळ

घमंडींत इतर थोरा मोठ्यांच्या मुलांप्रमाणें न पडतां गरीबांच्या मुलांप्रमाणें

जनार्दनपंतांनी आस्थापूर्वक अभ्यास केला व त्यामुळे ते आह्मां महाराष्ट्रीयांस

फारच उपयोगी पडले. या गोष्टीबद्दल ते खचित स्तुतीस पात्र आहेत.

 जनार्दनपंतांचा अध्ययनक्रम संपण्यापूर्वीच सुमारें सव्वा वर्ष त्यांना विद्या-

खात्याच्या मराठी भाषांतरकाराचे कचेरीत 'ट्रान्स्लेटर एक्झिबिशनर' नेमलें

होतें. तेव्हांपासून ह्मणजे सन १८६९ चे सप्टेंबर महिन्यापासून तो परवां देहा-

वसान होईपर्यंत त्यांनी विद्याखात्यांत निरनिराळ्या ठिकाणी कामे केली..

सन १८७१ साली प्रथमतः त्यांस नाशिक येथें फर्स्ट असिस्टंट मास्तर नेमिलें.

पण तेथील हवा त्यांच्या प्रकृतीस मानवेना ह्मणून त्यांनी आपली बदली रत्नागि-

रीस करून घेतली. ते रत्नागिरी व पुणे या दोन जिल्ह्यांत कांहीं काळपर्यंत

कायम डेप्युटी इन्स्पेक्टर होते. विश्रामबागचा व बुधवारचा वाडा यांस आग लागली

त्या सालीं पुण्यास हे डे. ए. इन्स्पेक्टर होते. पुढे ठाणे येथील हायस्कुलावर

त्यांची नेमणूक झाली. त्या जागेवर ते शेवटपर्यंत होते. ठाण्याच्या शाळेला

नांवारूपास मोडक यांणींच आणिलें. मध्यंतरीं कांहीं काळपर्यंत धुळे एथल हाय-

स्कुलावर यांची नेमणूक झाली होती. एकंदरींत यांची सर्व नोकरी शिक्षकाचे