पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४  चार चरित्रात्मक लेख.

वेंकरून हितचिंतक होते, तर त्यांचें सबंध चरित्र आह्मांस माहित असले पाहिजे,

व ते या पुस्तकांत आले पाहिजे. प्रश्न फार सयुक्तिक व रास्त आहे. परंतु

वास्तविक प्रकार असा आहे कीं, मोडकांचा व आमचा जो संबंध जडला व जो

त्यांचा आमच्याशी व्यवहार झाला तितक्या पुरती माहिती आह्मांस आहे व

ती क्रमशः येईलच; परंतु त्यांच्या विषयींची इतर माहिती आह्मांस असावी ति

तकी नाहीं. मोडकांचा ह्मणजे इतका अकस्मात् चिरंतन वियोग होईल, व हा

लेख लिहिण्याचा दु:खकर प्रसंग असा अनपेक्षित येईल, असे कोणाच्या ध्यानीं

मनीं तरी आले असेल काय ? मग ही अशुभसूचक माहिती मिळविण्याच्या

नादी कोण बरें लागला असता ? त्यांतून या आकस्मिक घाल्याचें दुःख इतकें

ताजें आहे की, या बाबतींत माहिती मिळविण्याचे खटपटींत पडवत नाही. या

व अशा अनेक कारणांमुळे आजचा लेख त्रोटक चरित्रापेक्षा जास्ती होऊं शकत

नाहीं. अशा सद्गुणी व विश्वकुटुंबी पुरुषाचें सायंत व विस्तृत चरित्र लिहिण्याचेंव

काम कोणी त्यांच्या अत्यंत घरोव्याच्या व निकटवर्ती मित्राने पत्करिले पाहिजे.

आतां तसे कोणी पत्करतो किंवा नाहीं हें समजणे कालगतीवर राहिले. असो.


 रा. रा. जनार्दन बाळाजी मोडक यांचा जन्म शके १७६७ पौष शुद्ध ३

बुधवार ह्मणजे तारीख ३१ डिसेंबर १८४५ रोजी झाला. त्यांचें राहण्याचें मूळ

गांव दक्षिण कोकणांत दापोली तालुक्यांत पंचनदी हे होय. यांचे वडील बाळा-

जी कृष्ण मोडक, यांची मूळची स्थिति गरिबीचीच होती. परंतु पुढे त्यांनीं

चांगलें दैव काढिले. त्यांनी बरीच वर्षे इंग्रजी अमलांत ह्मणजे खालसा प्रांतांत

माल खाल्यांत (रेव्हिन्यू डिपार्टमेंटांत ) बऱ्याच ठिकाणीं मामलतीचें काम केले.

पुढे पेन्शन घेतल्यावर कोल्हापूर दरबाराकडून कोल्हापूर प्रांती त्यांजकडे कांहीं

काम होतें. ते कोल्हापूर मुक्कामी कामावर असतां तेथें त्यांस थोड्या कालापूर्वी

ह्मणजे १६ मे १८८७ रोजी देवाज्ञा झाली. बापाचा मुलाकडे फार ओढा होता

असे दिसत नाही, कारण बापामुलांना प्रेमबद्ध करणारी सांखळी जी मुलांची

आई ती जनार्दनपंताचे दुर्दैवामुळे फार दिवस राहिली नाहीं. हे अगदी लहान

असतांच यांची जननी निवर्तली. त्यामुळे यांचे संगोपन त्यांच्या चुलत्याने व

चुलतीनें केले व यांस लहानाचें थोर केले. बाळाजीपंतांस द्वितीय कुटुंबापासून

एक मुलगा व एक मुलगी आहेत. जनार्दनपंतांस सख्खे भावंड कोणी नाहीं,