पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.  ३३

 आमचे परमप्रियमित्र कैलासवासी मोडक हे समर्थांच्या उत्कृष्ट सच्छिष्यांपै

की एक अग्रणी होते असे त्यांचे वर्तनावरून सहज पाहिजे त्याच्या लक्षांत

येईल. आरंभी दासबोधांतील उद्धृत ओंव्यांवर जर कोणी कीर्तन करूं पाहील

तर त्याला अनुसंधान लावण्यास आमच्या परमपूज्य मित्राच्या चरित्रासारखें

पदोपदीं त्या उपदेशाचें शब्दशः सार्थक्य करणारें दुसरें आख्यान मिळणार

नाहीं. आमच्या मित्राचें आचरण इतकें पवित्र, त्यांचें मन इतकें निर्मळ, त्यांचा

व्यवहार इतका चोख, त्यांचा व्यासंग इतका जबर, त्यांची वाणी इतकी रसाळ,

त्यांचे विचार इतके पोक्त व खोल, त्यांची बुद्धि इतकी विशाल व व्यापक, त्यांचे

लेख इतके गंभीर पण उत्तानार्थ, त्यांचें प्रेम इतकें अकृत्रिम व निरपेक्ष, कीं

जरी या प्रत्येक गोष्टींत कांहीं लोकोत्तर नाहीं असे कित्येक ह्मणतील तरी इत

क्या गोष्टी एकाच व्यक्तीच्या ठिकाणी एका काळी सांपडतात हे पाहून कोणाचें

मन थक्क होणार नाहीं ? आमच्या इकडील नवीन व जुन्या मंडळींत वेळाचें

खरें मूल्य एक रा. सा. मंडलीकांस कळत होतें; इतकेंच नव्हे, पण ते आपल्या

व्यवहारानें तें मूल्य पूर्णपणें उमजत होते असे त्यांनी दाखविलें, अशाबद्दल

त्यांची ख्याति आहे, व ती यथार्थ आहे. परंतु मोडकांच्या संनिधवर्ती मित्रांकडून

असें खात्रीलायक कळतें कीं, मोडकांनी आपल्या व्यवहारानें वेळेच्या मूल्यासंबं

धानें मंडलीकांवरही तान केली होती. मंडलीकांचा व्याप मोठा, स्वभाव तिखट,

व मोठमोठ्या कार्याशीं व व्यक्तींशी संबंध पडल्यामुळे त्यांचें कालनेमित्व जितकें

लोकांच्या दृष्टोत्पत्तीस आले तितकें मोडकांचें आलें नाहीं, यांत नवल नाहीं. मोडक

हे स्वभावाचे मनमिळाऊ व मोठे गोड, व समर्थांचे उपदेशानुरूप 'परान्तरासीं

राखणें । सर्वकाळ ' हा त्यांचा होतां होईल तो क्रम. तेव्हां त्यांचें कालनेमित्व

लोकांचे नजरेत भरेल असे नव्हतें. कालनेमित्व गाजवायाला तुसडा स्वभाव,

स्वार्थैकदृष्टि, लोकांविषयीं बेपर्वाई वगैरे अनुकूल साधनें आहेत. ह्या सर्व गोष्टी

स्वभावत:च मोडक यांस प्रतिकूल असतांही त्यांनी आपलें कालनेमित्व गाजविलें,

याबद्दल ते अत्यंत स्तुतीस पात्र आहेत. आमचे मित्र मोठे विद्याव्यसनी, दृढो-

योगी, अंगीकृताचा शेवटपर्यंत निर्वाह लावणारे, असे होते हैं त्यांच्या पुढील

त्रोटक चरित्रावरून लक्षांत येईल. त्रोटक चरित्र कां, असा सहज कोणी प्रश्न करील.

कारण ते जर आमचे अकृत्रिम स्नेही होते, उदार साहाय्यक होते, व मनोभा-