पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३२  चार चरित्रात्मक लेख.

________________________________________________________________

जनकांनीं व त्याचे साहाय्यकांनी पहिल्यापहिल्यानदां फारच लाडावून सोडलें

होतें; व त्याला पचतील किंवा नाहीं, त्याला आज संवय लावली खरी पण ती

शेवटपर्यंत त्याची निभावून जाईल की नाहीं, इत्यादि गोष्टींचा प्रेमभरामुळे विचार

न होऊन, त्याला त्याच्या जनकांनी मिष्ट खऱ्या पण सहज न मिळणाऱ्या पदा-

र्थांच्या सेवनाची चटक लावून सोडली. मुलाला काय एकदा मिष्ट पदार्थ खा-

याला मिळायाला लागले ह्मणजे त्याला रोजच्या कण्या भाकरीचा कंटाळा येऊं

लागतो. पण सगळेच दिवस सारखे कोठून असणार, याचा त्याला मुळींच विचार

नसतो; आणि जर का कालगतीनें वाईट दिवस आले, तर अशा मुलाची अशी

दैना होते की शेवटीं हाय खाऊन तें डोळे मिटतें. असाच प्रकार विविधज्ञानविस्ता-

राचा झाला. त्याच्या जनकांनीं इतर मिष्ट पदार्थोंबरोबर त्याला लीलावतीचा खुराक

लाविला. पुढें विविधज्ञानविस्ताराच्या दैवदुर्विपाकामुळे त्याला जी गंडांतरें आली

त्या धांदलीत हा लीलावतीचा त्याचा खुराक बंद झाला. मग जशी एकाद्या

दरिद्री अफीमजीची अफूचा खुराक न मिळल्यामुळे अत्यंत शोचनीय स्थिति

होते, ह्मणजे त्याचे हातपाय मोडून जातात, तोंड वाळून जातें, सुस्ती येते, ज्वर

येतो, इतर कोणत्याही पदार्थाची त्यास गोडी लागत नाहीं, फार काय तो मृत-

प्राय होऊन जातो-तद्वत् या विविधज्ञानविस्ताराची हा खुराक नसल्यामुळे स्थि-

ति झाली होती. परंतु मोडकांच्या विश्वक्कुटुंबीय वृत्तीमुळे त्यास त्याच्या चटकेचा

पदार्थ पुनः मिळूं लागला व त्याचे हे मिटेष्टान्नदाता पिता झाले व आमरणान्त

ते तसे राहिले. तेव्हां त्यांच्या परलोकगमनाने त्याची केवढी भयंकर नुकसानी

झाली आहे व तीही प्रत्यक्ष, याचा विचार मनांत येऊन खरोखर हा लेख लिहि-

ण्यास आमचें मन प्रवृत्त होत नाहीं व लेखणी धजत नाहीं, यांत कांहीं नवल

नाही. परंतु मनुष्यास या व्यवहारांत राहणे आहे तावत् त्यानें व्यवहाररीतीस

अनुसरून समयास सादर झाले पाहिजे. तदनुरूप या पुस्तकावर व महाराष्ट्र

लोकांवर मोडकांचे जे अमूल्य उपकार झाले आहेत त्यांचें अंशतः तरी

स्मरण करावें, त्या उपकारांबद्दल आह्यो उतराई तर होऊं शकतच नाहीं खरे तरी

कृताज्ञताबुद्धिं दाखवावी, व — सखीजनसंविभक्तं हि दुःखं सह्यवेदनं भवति' ह्या

सदुक्तीचा प्रत्यय पाहून दुःखभार कमी होईंल तर पहावा या हेतूनें प्रस्तुत चरि-

त्र लिहिण्यास सरसावतों,