पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै० जनार्दन बाळाजी मोडक, बी. ए.  ३१

___________________________________________________________________

 पूर्वी एका प्रसंगीं श्रीसमर्थांच्या एका सच्छिष्येचें त्रोटकसें चरित्र लिहि-

ण्याचें काम जरी एक्या परी अभिनंदनीय तरी बहुता परी दुःखकर असे आह्मां-

कडे आले होतें. तें कसें तरी केलें. परंतु आज समर्थांच्या एका सच्छिष्याचें

चरित्र लिहिण्याचें सर्वतोपरी दुःखकर असे काम करावे लागत आहे, त्या योगानें

आमचें मन व लेखणी हीं दोन्हीही कर्तव्यपराङ्मुख होऊं पाहत आहेत. अशी

त्यांची स्थिति व्हावी हैं अगदी साहजिक आहे. 'परदुःखेन दुःखिता विरलाः'

ही सत्कव्युक्ति खरी असल्यामुळे त्या सच्छिष्येविषयीं लिहितांना मनाची स्थिति

आजच्या इतकी उद्विग्न झाली नव्हती. याचे कारण, सौ. आनंदीबाईच्या अका-

लिक मृत्यूनें आपल्या सर्व देशाचें नुकसान झालें, व देशाबरोबर परोक्षतया व

अंशतः आमचेंही नुकसान झाले, किंवा जो कांहीं फायदा पुढे होईल अशी बळ-

कट आशा होती तिचा तंतु तुटून गेला. तेव्हां नुकसानीच्या भाराचा कांहीं

अंश आह्मांस सोसावा लागला ह्मणून त्या मानानें आमच्या मनाला उद्विग्नताही

कमी भासली. परंतु आजच्या आमच्या चरित्रनायकाच्या संबंधानें नुकसानीचा

सर्व भार विविधज्ञानविस्तार व त्याचे कांहीं व्यवसायबंधु व भगिनी यांजवर

आहे. व देशास व विशेषतः महाराष्ट्रभाषेस जी प्रचंड हानि झाली आहे ती

देखील आह्मां ( विविधज्ञानविस्तार व इतर वंधुभगिनी ) मार्फत तेव्हां आज

आमचें मन अत्यंत उद्विग्न व्हावें यांत अगदी नवल नाहीं. त्यांतून जोडक यांचा

विविधज्ञान विस्तारावर आज सोळासत्रा वर्षांचा अत्यंत प्रेमा होता. तो इतका

कीं, त्यांच्या स्वकीय अर्भकावर ( काव्येतिहाससंग्रहावर ) देखील त्यांचा लोभ फार

कमी होता. इतका अकृत्रिम व अहेतुक लोभ विविधज्ञानविस्तारावर मोडकांचा

कां व कसा जडला, याची मीमांसा होणे फार कठिण आहे.

 आमच्या मतें तर केवळ मोडकांचा उदार स्वभाव याला कारण आहे.

कळवळ्याची जाती । लाभावीण करी प्रीती।' हें या लोभाचें मूळ बीज असावें

असा आमचा ग्रह आहे. विविधज्ञानविस्तार देखील मोठा भाग्यशाली आहे

हेंही या लोभाचें कारण असावें. कोणतेही कारण असो, विविधज्ञानविस्तारावर

मोडकांची कृपादृष्टि निरपेक्ष, अकृत्रिम व अत्यंत होती ही गोष्ट निर्विवाद आहे.

या गोष्टींचें प्रत्यंतर पहाण्यास विविधज्ञानविस्ताराच्या सहाव्या पुस्तकापासून आ-

जच्या अंकापर्यंत बहुतेक अंक साधनीभूत होतील विविधज्ञानविस्ताराला त्याचे