पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८   चार चरित्रात्मक लेख

 अन्नाच्छादन देउनी निशिदिनीं जे आपणा रक्षिती,

 त्यांना मानव काय वन्य पशुही अत्यादरें सेविती.

 तैसा पालक आपुला समजुनी स्त्रीनें पती सेविला,

 केले काय विशेष त्यांत ह्मणुनी तीनें कळेना मला,  

 पौलस्त्यासम दुर्मदांध नृपची सोडोनि लज्जा जयीं

 पातिव्रत्यधनावरी दरवडे घालीत होते तयाँ

 त्याचें रक्षणची करोनि वरिती कीर्तीस नारी जरी,

 नाहीं त्यांस विशेष काय करितां त्याहूनि येते तरी ?  

 नारी वा नर हो करोनि पहिली ज्ञानार्जन स्वोन्नति

 अन्यांचीहि सुधारती स्वकृतिनें जे दुःखदात्री स्थिति,

 केलें जन्मुनियां खरोखर जगीं त्यांनीच कांहीं तरी;

 साजावीच तरी ' मनुष्य' पदवी त्यांनाच साजे खरी.  

 झाली गौतमशंकरादि पुरुषांमाझारि रत्ने अशी,

 साध्वी तूंच इथें परंतु पहिली जन्मास येशी तशी;

 ही अत्युक्ति दिसो दिसेलाच तरी देशाभिमानी जनां;

 नेणें मी अभिमानची परि दुजा सत्याभिमानाविना.  

 आज्ञा वंदुनियां शिरी स्वपतिची जाऊनि देशांतरीं,

 विद्याभ्यास तिथें करूनि, बरुनी सन्मान, येशी घरी;

 आहे गोष्ट खरी, मलाहि करंणी वाटे तुझी ती बरी-

 ह्यासाठींच पार न केवळ तुला माझी स्तवी वैखरी.  

 ज्या मार्गात परंतु फार असती विघ्ने असे भावुनी

 भेणें दूरची राहिलों पुरुषही आह्मी तयापासुनी,

 नारीही तुजसारखी न मळतां निर्वित त्या आक्रमी

 हें त्वां दाखविलें; स्तवीत ह्मणुनी आहे तुला आज मी.  १०

 केले साहस हैं तुवां धरुनियां उद्देश ने जे मनीं

 ते ते सिद्ध न होत तोंच जग हैं गेलीस तूं सोडुनी !

________________________________________________________

१. रावण. २ गौतम बुद्ध, शंकराचार्य.