पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  २९

_______________________________________________________________

 झाली हानि खरी; पुढें न भरुनी येईल ती काटितां !

 तेणें लेश परी यशोनिधि तुझा झालाच नाहीं रिता.  ११

 नारी त्वत्सम थोर आर्यभुवनीं जन्मोनियां यावरी

 साराया झटतील दुःखद दशा स्वीय स्वसांची दुरी;

 बाई घालुनियां परंतु पहिला आहे धडा त्वां दिला,

 आनंदें इतिहासकार ह्मणुनी गातील आधी तुला.  १२

 स्त्रीनें जन्मवरी घरांत बसुनी फुंकीत जावें चुली,

 बेचाळीस कुळे पवित्र ह्मणजे केली तिनें आपली;

 ज्यांना आवडले असेल मत हैं त्यांनी तुला निंदुनी

 घ्यावें अज्ञजनी मिळेल तितकें धन्यत्व संपादुनी.  १३

 योषिद्रत्न पडे परंतु पदीं ज्याच्या तुझ्यासारखें

 त्याचाही मज धन्यवाद नकळे गावा किती या मुखें;

 केली भूषित आर्यभूच मग ही सारी जिनें, त्या तुझें

 वर्णाया यश शारदाच बहुधा आली स्वयें पाहिजे !  १४

 पद्ये हीं चवदाच काय चवदा वर्षे जरी लागती

 साध्वी त्वगुण वर्णितां न मति ही माझी तरी भागती

 हा ! हा! पुण्य परंतु आज पदरीं माझ्या नसे एवढे !

 येई चालवितां न यास्तव मला ह्या लेखणीला पुढे !  १५