पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२६   चार चरित्रात्मक लेख.

रत्न हरपावें हें आमचें सर्वोचें महद्दुर्भाग्य नव्हे तर काय ? ' पूर्वेकडील तारा

ह्मणून जे पुस्तक गतवर्षी प्रसिद्ध झाले आहे त्यांत 'आर्यभूमीचा विलाप'

ह्मणून जीं पद्ये प्रसिद्ध झाली आहेत त्यांत ती ह्मणते - Woe is me !

too bright to last ! ' गेले पार ते, हाय हाय रे ! उज्ज्वल बहु तें नित्य

नसे ' ती गोष्ट अक्षरश: खरी आहे. आधीच आमच्या देशांत स्त्रीशिक्षणादि

प्रकार कमी; त्यांतूनं कोठें चुकूनमाकून एकादी स्त्री देशास भूषण होईल व देशाचे

शक्त्यनुसार पांग फेडील अशी निपजलीच, तर पुढे असा दुःखद प्रकार प्राप्त

व्हावा ! तेव्हां आमचा देश फुटक्या कपाळाचा ह्मणावें, आणखी काय? आमच्या

एका मित्रानें तीन चार वर्षांपूर्वी आपल्या एका विद्वान् बहिणीस एक कविताबद्ध

पत्र लिहिले होतें. त्यांत स्त्रीशिक्षणादि संबंधानें आर्यदेशास साहारा ह्मणून जें

आफ्रिकेंत वाळूचें मैदान आहे त्याची उपमा दिली आहे, व त्या मैदानांत जे

कोठें कोठें oasis नांवाचे पाण्याचे झरे मिळतात त्यांची उपमा आनंदीबाई-

सारख्या स्त्रियांस दिली आहे. ते आपल्या बहिणीस लिहितात:-


 “ साहाऱ्यामधुनी यदा पथिक की जाई, तदा त्या दिसे

 वाळूचा बहु दीर्घ रुक्ष उदधी, छाया न पाणी असे ।

 नेत्रां रंजन की मनास सुख दे ऐसें न त्या सांपडे.

 सारें रुक्ष तिथें बघोनि मुखही त्याचें घडे बापडें !   

 जातां श्रांत घडे, तृषा बहुतशी पीडा तथा दे तदा,

 होई खिन्न, गमे तया सकळ ही सृष्टी जणूं आपदा ।

 ऐशामाजि जरी तयास मिळतो तो कीं सुधेचा झरा

 होई त्या किति हर्ष, जीव दुसरा येई जसा की खरा !   

 झाली होती स्थिति मम तशी पाहुनी आर्यदेश;

 स्त्रीविद्येचें अमृत न तिथें, ना असे सौख्यलेश ।

 आनंदी ती बघुनिहि रमा पंडिता, दत्त तारा,

 वाटे त्याचे दिवस सरले उन्नती ये भरारा."    

हर | हर ! आमच्या मित्राचा ओआसिस ( तो कीं सुधेचा झरा ) दिसला


न दिसला तोंच आटून जावा व त्याचें तोंड जशाचें तसेंच बापडें रहावें ! असो. 

_____________________________________________________________

  • नागपूरसमाचार, १-११-८६.