पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  २५

___________________________________________________________

 'वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ।

 'लोकोत्तराणि चेतांसि कोहि विज्ञातुमर्हति ।

'

" अशी जी कवि भवभूतीची उक्ति, किंवा-

 'मऊ मेणाहूनी आह्मी विष्णुदास ।

 ' कठीण वज्रास भेदूं ऐसे ॥

 ‘अमृत तें काय गोड आह्मांपुढे ।

 ' विष तें वापुढें कडू किती ॥

 'मायबापाहूनी आह्मी कृपावंत ।

 'करूं घातपात शत्रुहूनी ॥


अशी जी साधु तुकारामाची उक्ति, ही किती सत्य आहे याचें प्रत्यंतर थोर

व्यक्तींच्या चरित्रापासून अनेक वेळां मिळतें. आमच्या आनंदीबाईच्या चरित्रां-

तूनही या उक्तीची सत्यता दिसून येण्याजोगी आहे. जी बाई आपल्या वयाच्या

सोळा सतराव्या वर्षी अमेरिकेसारख्या दोन तीन महिन्यांचे वाटेवरच्या परमुल-

खांत, स्वकीय असें कांही नाही, अशा ठिकाणी एकाकी आपल्या राजीखुषीनें जाण्यास

सजली, इतकेच नव्हे पण खरोखर तिकडे गेली व तीनवर्षे तिकडे जिनें काढलीं, त्या

बाईचें धैर्य, मनाची कठिणता व संकल्पाची दृढता या गोष्टी तर वर वर पाहणारास

सुद्धां 'वज्रादपि कठोराणि' या सदरापैकी आहेत असें कबूल करावे लागेल.

अशा बाईनें आपल्या कांहीं देशभगिनींवर जो एक प्रकारचा जुलूम होत आहे

त्याचा विचार मनांत कांही कारणानें आला असतां घळघळां रडावें; व आपल्या

हातून त्यांस कांहीं साहाय्य होईल तर करावें अशा बुद्धीनें अमेरिकेहून पत्रे

पाठवावीं; व ' मी परत आल्यावर असा असा उद्योग या कामीं करीन; तूर्त

माझी पूर्ण सहानुभूती आहे' असे मोठ्या आश्वासनपूर्वक लिहावें ! ही गोष्ट

" मायबापांहूनी आह्मी कृपावंत " या सदरापैकी नव्हे काय ? खरोखर

आनंदीबाई लोकोत्तर मनाची होती यांत कांहीं संदेह नाहीं.

परंतु आमचा देश खरोखर मोठा अभागी ! त्याला चांगला पदार्थ जणूं

भावतच नाहीं असे दिसतें. नाहीं तर इतक्यांतच आनंदीबाईंवर काळाची

गदा येण्यास काय झाले होते ? वयाचें नुसतें एकविसावें वर्षही पूर्ण झाले

नाहीं तोंच तिजवर मृत्यूचा घाला पडावा, व आमच्या जवळचें एक अमूल्य