पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२४   चार चरित्रात्मक लेख.

_____________________________________________________

आनंदीबाई होतील. खरेंच आहे, बायका बऱ्याच अंशानें नेयबुद्धि असतात,

तेव्हां त्यांस नेता कोणी चांगला कळकळीचा व हिताचा पाहिजे. ज्याला त्याला

आपली बायको विद्वान्, शहाणी, सुगुणी असावी अशी इच्छा; परंतु त्याबद्दल निवळ

इच्छेच्या पलीकडे एक काडीभर देखील त्यांच्या हातून उद्योग होत नाहीं. नहि

सुप्तस्य सिंहस्य प्रविशंति मुखे मृगाः ।' हा प्रकार ह्मणजे कांहीं नवीन सांगितला

पाहिजे असें नाहीं. तेव्हां आनंदीबाईने आपल्या उदाहरणाने इतके सुचविले की,

आपण केवळ गारगोट्या समजून ज्यांची उपेक्षा करिता,त्य गारगोट्या नसून

फार स्वछ व वजनदार हिरे आहेत,मात्र शाणोल्लेखसंस्कार करणारा पारखी

जव्हेरी पाहिजे; व तो गुण आपल्या अंगीं नाहीं. ' हे आमच्या गुरुभगिनीनें अमे-

रिकेहून चांगले कमावलेले मखमाली...आणले. त्यांपैकी आमच्या वांट्याचे तर

आह्मी ठेवून घेतले आहेत; पण बाकी राहिलेले ज्याचे त्यानें आपले घेऊन

जावे, व अजून तरी पुढे असा प्रसंग न यावा अशाबद्दल खबरदारी कांही घेतां

येण्याजोगी असल्यास घ्यावी, अशी त्यांस प्रेमभावानें सूचना करतो. तिसरी एक

महत्त्वाची गोष्ट या चरित्रापासून शिकण्याजोगी आहे कीं, 'सत्य संकल्पाचा

दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ।' गोपाळरावांची पैशासंबंधाने अशी

स्थिति नव्हती की, त्यांनी आपल्या पत्नीस दूर विद्याभ्यासार्थ पाठवावें. परंतु

केवळ त्यांच्या खटपटीमुळे, दृढ व अव्याहत उद्योगामुळे, व सत्यसंकल्पामुळे,

हा त्यांचा मनोरथ परक्या देशांतल्या ओळखना देख अशा एका कुलस्त्रीस नि-

मित्त करून नारायणानें पूर्ण केला. ह्या कार्पेटर बाईचें औदार्य व जवळ असलेल्या

पैशाचा सद्व्यय करण्याची बुद्धि यांचा सर्व ऐपतवाल्या लोकांनी कित्ता घेण्या-

जोगा आहे. असो. या आमच्या समर्थांच्या साच्छष्येच्या अल्प परंतु सदुपदेश-

परिप्लुत चरित्रापासून आणखीही पुष्कळ बोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत, परंतु

त्याचा उल्लेख करण्याचें काम रा. केतकर वकीलांच्या जाहिरातीप्रमाणे जे कोणी

या देशभगिनीचें विस्तृत चरित्र लिहितील किंवा लिहित असतील त्यांजकडे

सोपवितों.

______________________________________________________________

 * Full many a gem of purest ray serene,

 The dark unfathomed caves of ocean bear;

 Full many a flower is born to blush unseen,

 And waste its sweetness on the desert air!

        Gray.