पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  २३

______________________________________________________

तिच्या मनावर किती ठसले होते याची पदोपदीं साक्ष मिळत आहे. ज्यांनीं

कोणीं तें भाषण वाचून पाहिले नसेल त्यांनीं तें अवश्य वाचून पहावें, अशी

त्यांस आमची आग्रहपुरःसर शिफारस आहे. धन्य आनंदीबाई ! धन्य तुझी !

इतक्या अल्प वयांत आपल्या आचरणानें इतकी उज्ज्वल कीर्ति संपादावीस

तेव्हां तुझ्या गुणांची स्तुति करण्यास पुरेसे आमच्या जवळ भांडवल नाहीं,

याबद्दल आह्मांस खरोखर अत्यंत दुःख होतें. ज्याच्या संगतीनें, उपदेशानें व

ज्यानें स्वत: आचरणानें घालून दिलेल्या कित्त्यानें तुला इतकी योग्यता मिळाली

त्या गोपाळरावाची तारीफ कितीही केली तरी पुरी होणार नाहीं!' जन्मा

आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ, ' ह्मणून जो समर्थांचा उपदेश आहे

त्याप्रमाणे गोपाळरावांनी आपले व आनंदीबाईचें जन्मसाफल्य केले यांत कांही

एक संशय नाहीं; इतकेंच नव्हे, तर त्यांनी सर्व महाराष्ट्रांतीलच काय पण सर्व

हिंदुस्थान देशांतील लोकांवर स्वाचरणाचा उत्कृष्ट कित्ता घालून देऊन अतोनात

उपकार केले आहेत. त्यांबद्दल त्यांचे उतराई हे लोक कसे होतील हें अद्यापि

पाहणें आहे. आमच्यापैकी काही लोकांनी जणूं आपण कार्तिकस्वामीचे अवतार

आहों अर्से मनांत मानून, स्त्रियांस योग्य हक्क, योग्य मान, योग्य विद्या वगैरे

देण्याबद्दल जे थोडेबहुत प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यांजवर यथाशक्ति थंडगार पाणी

टाकण्याचा प्रयत्न केला व करीत आहेत. त्यांची आनंदीबाईने आपल्या धारिष्टानें,

विद्येनें, सौजन्यानें व शुद्धाचारानें, न बोलतां सवरतां, कशी नामी नार्के ठेंचली

ही गोष्ट पण आपण विसरता कामा नये.

 ह्या आनंदीबाईच्या अल्पच पण मोठ्या महत्त्वाच्या चरित्रापासून आपणा

सर्वांस शिकावयाजोग्या पुष्कळ गोष्टी आहेत. मात्र थोडेसे डोळे उघडून पाहिलें

पाहिजे. प्रथम व मुख्य गोष्ट आनंदीबाईनें आपल्या कृतीने आह्मां सर्वास सिद्ध

करून दाखविली ती ही की, स्त्रिया अबला, बुद्धीनें हीन, पुरुषांप्रमाणें कष्ट सोस-

ण्यास व साहस करण्यास कधीं टिकावयाच्या नाहीत, वगैरे जे त्यांजवरील

आरोप आहेत ते सर्वथैव खोटे आहेत, व केवळ दुराग्रहमूलक आहेत. तिनें

दुसरी एक गोष्ट अशी सिद्ध करून दाखविली की, जर बायकांना आपला उप-

देश आपल्या आचरणानें व कृतीनें आपल्या शिष्यांच्या मनावर उत्तम प्रकारें

ठसवितील असे खरे कळकळीचे व खरे हिताचे गुरु भेटतील, तर त्या प्रति-