पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२२   चार चरित्रात्मक लेख.

मानानें मंत्रसिद्धिही पण पुष्कळ झाली. आतां समर्थांनी केलेल्या उपदेशापैकी

कोणकोणत्या भागांचा आनंदीबाईस गोपाळरावांनीं मंत्रोपदेश केला याचें

जरी आह्मांजवळ टांचण नाहीं तरी आमच्या चरित्रनायिकेच्या आचरणावरून

ज्या भागांचें ठसठसित प्रतिबिंब तिच्या मनावर उमटलेले दिसतें ते भाग

कोणते हैं सहज सांगतां येतें.


  " जनीं बोलण्यासारखे आचरावें '

कारण ' क्रियेवीण वाचालता व्यर्थ आहे. '

 ‘ समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा |

 आला तरी कळों न द्यावा । जगामाजी ॥

 धक्के चपेटे सोसावे । नीच शब्द सोशीत जावे ।

 ‘ पस्तावोन परावे । आपुले होती ॥'

 ' पोटीं चिंता धरूं नये । कटें खेद मानूं नये ।

 ‘ समयीं धीर सोडूं नये । कांहीं केल्या ॥

 जो दुसऱ्याचें अंतर जाणे | देशकालप्रसंग जाणे ॥

 तथा पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ '

 करें काया झिजवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।

 चटक लावूनी सोडादी । कांहीं एक ॥

वगैरे. हे उपदेशभाग आनंदीबाईच्या मनावर इतके कांहीं ठसले

होते कीं, तिच्या आचारांत विचारांत ते भाग आपोआप पुढे येत.

श्रीरामपुराहून जेव्हां आनंदीबाईचा अमेरिकेस जाण्याचा निश्चय ठरला तेव्हां

तेथें तिनें इंग्रजीत एक व्याख्यान दिले. त्यांत – १, अमेरिकेसच जाण्याचा विचार

कां ह्मणून केला; २. हिंदुस्थानांत वैद्यक विद्या शिकण्याची स्त्रियांस सोय नाहीं; ३.

इतकेच नव्हे तर येथें स्त्रियांस कोणतीच विद्या शिकण्याची सोय नाहीं व लोकां-

कडून विद्याभिलाषी स्त्रियांचा छळवादही होतो; ४, अमेरिकेस एकटीच आपण कां

जातें व आपला परदेशांत पाठिराखा कोण; व ५, अखेरीस अमेरिकेहून परत

आल्यावर आपणास लोक जातिबहिष्कृत करतील की काय; वगैरे प्रश्नांचें तिनें

मोठ्या सुरस व खुबीदार भाषेनें उत्तर दिले आहे. त्यांत हे पूर्वोक्त उपदेशभाग