पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  २१

___________________________________________________________

लक्षांत बाळगावे असे वाटले नाही. या दोहोंपैकीं कांहीं तरी एक प्रकार झाल

असावा. तशांतून आणखी काही वर्षे आनंदीबाई वाचती व विशेष नांवालौकि

काल चढती तर तिच्या नातलगांनी व इष्टमित्रांनी तिच्या वैभवसूचक कांही

गोष्टी - कांही वास्तविक, कांहीं संभवनीय व कांही काल्पनिक - तिच्या चरित्रांत

गोवण्याकरितां सादर केल्या असत्या, व एकादा मुलींच्या शाळेचा मास्तर असें

सांगण्यास पुढे सरसावला असता की ' मला तेव्हांच वाटत होतें कीं आज जरी

हिचें लक्ष शिकण्यावर नाहीं तरी ही पुढे फारच नांवालौकिकास चढेल. ' आह्मी

ह्मणतों असा प्रकार अजून ह्मणजे होणार नाहीं असें नाहीं. निदान तूर्त मात्र

तिच्या बाललीलेची आम्हास माहिती मिळाली नाहीं. असो.

तिचें लग्न झाल्यानंतर तिच्या मतीच्या अनुषंगाने तिच्या चरित्राचा ओघ फि-

रला. त्याला नवीन दिशा व नवीन वळण लागले. हिंदुसमाजांत कुमारिकावस्थेत

गुरुपदेश होत नसतो, व विशेषतः बायको न्हातीधुती झाली ह्मणजे वयासंबंधानें

बहुधा तिला मंत्रोपदेश घेण्याची पात्रता येते. या नियमानुसार आनंदीबाईस

ती न्हातीधुती झाल्यावर गुरुदीक्षा मिळाली. तोपर्यंत मंत्रोपदेशास तिनें अधि

कारी व्हावें अशाबद्दलची तयारी चालली होती. पुरुष किंवा स्त्री अधिकारसंपन्न

झाल्यावांचून मंत्रोपदेश करूं नये, असे वेदान्तादि सर्व शास्त्रांचें मुख्य प्रमेय आहे

.

तिचे दीक्षा देणारे गुरु तिचे भ्रतार गोपाळराव, त्यांनी तिला प्रथम मराठी

चांगलें शिक्षण दिलें, व नंतर इंग्रजी भाषेचाही चांगला अभ्यास तिच्याकरवी

करविला. इतर प्रकारें ह्मणजे संभाषणानें, चांगल्या चांगल्या लोकांच्या चरित्र-

कीर्तनानें, पठनानें व पाठनानें, व स्वत:च्या आचरणानें तिचें मन संस्कृत करण्याचा

परिपाठ चालविला. अशा योगें जेव्हां ती अधिकारसंपन्न झाली अशी त्यांची

खात्री झाली, तेव्हांपासून तिला मंत्रोपदेश करण्याचें त्यांनी सुरू केलें, अमक्या

दिवशी अमक्या मुहूर्तावर त्यांनी आनंदीबाईस उपदेश दिला असें गोपाळरा-

वजींस सुद्धां ठाम सांगतां येणार नाहीं. कारण इतर गुरुमहाराजांच्या 'नमो भगवते

वासुदेवाय' वगैरे परिमिताक्षरी मंत्रांसारखा यांचा मंत्र नसल्याकारणाने त्यालाही

परिमित काल पुरेसा नव्हता. त्यांचा मंत्रोपदेश कित्येक वर्षे चालला होता.

जसजसा एक एक भाग अवगतच काय परन्तु बिंवत जाई तसतसा उत्तरभागाचा

उपदेश ते करीत जात. अशा योगानें काल फार लागला खरा, परन्तु त्याच