पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२०  चार चरित्रात्मक लेख.

उपदेश घ्यावा व त्यांची सच्छिष्या व्हावें यांत नवल मानण्याजोगे कांही नाहीं. प्रभु

येशू ख्रिस्त, रामदास, पंडित दयानंद सरस्वती वगैरे लोकांना जे कोणी पारमा-

र्थिक गुरु समजत असतील ते समजोत. परंतु वास्तविक प्रकार कांही अगदी

निराळा होता असे मोठ्या मोठ्या विचारी व समंजस लोकांचें ह्मणणे आहे.

तेव्हां पारमार्थिक दृष्टीनें आनंदीवाई मर्थांची सच्छिष्या होती असे ह्मणण्याचा

आमचा बिलकुल कटाक्ष नाही. मात्र ज्या प्रकारचा व ज्या धोरणाचा उपदेश

मर्थांनी केला याचें खरें हृद्य तिला कळले व त्याप्रमाणे तिनें कृतिही करून

दाखविली, हाणून तिला समर्थांची 'सच्छिष्या' असें आह्मी ह्मणतों.


 आतां आनंदीबाईनें दीक्षा कोणाकडून घेतली व कधी घेतली व कोणता मंत्र

घेतला, तो मंत्र पाळला कसा, व त्याबद्दल तिला काय काय साधनें करावीं

लागलीं, वगैरे बद्दलचा त्रोटकसा इतिहास आह्मी देतों. कारण विस्तृत देण्यापुरती

आह्मांजवळ सामुग्री नाहीं, व काळ व स्थळही नाही. आनंदीबाईचें माहेरचें

नांव यमुना. तिचें जन्म पुणे येथें तिच्या आजोळी शके १७८७ त रामनवमीस झाले.

हा रामनवमीचा योगही लक्षांत ठेवण्याजोगा आहे; कारण डोहाळ्यावरून मुला-

ची परीक्षा होते, तशाच प्रकारानें जन्मदिवसावरून मूल कोणत्या संप्रदायाचें

व प्रकारचें होईल याचा अंदाज करतां येतो, असें जुन्या लोकांचें ह्मणणे आहे. त्या

शिवाय समर्थांचेंही जन्म रामनवमीसच झाले. तिचें लग्न तिचे वयाच्या १० वे

वर्षी रा. रा. गोपाळराव जोशी संगमनेरकर यांच्याशी झाले. तिच्या सासरमा-

हेरच्या घरचें आडनांव जोशी. परंतु दोन्हीं घराणी भिन्नगोत्री असल्याकारणाने

दोहोंत विवाहसंबंध होण्यास कांही अडचण नाही. आनंदीबाईचें लग्नापूर्वीचे

चरित्र कांही विशेष स्मरणीय नाहीं. जशीं घरची इतर चार मुलें होती तशी ही

एक पांचवी. आणि वास्तविक पाहिले असतां तें वयही कांही विशेष स्मरणीय

कृति हातून व्हाव्या असें नाहीं. जान स्टुअर्ट मिल, ज्ञानेश्वर, किंवा कोल्हापूर

येथील एका प्रेमांधाने लिहिलेल्या 'अद्भुतबालकरमणीयचरित ' नांवाच्या

गद्यपद्यमय लहानशा पुस्तकाचा नायक राम, यांसारख्या गर्भबुद्धिमती व्यक्तींची

व गर्भश्रीमंतांच्या मुलांची बाललीला देखील अत्यंत स्मरणीय व चिंय असते

तो प्रकार निराळा. परंतु आनंदीबाई दोनही कोटींतली नसल्याकारणाने तिच्या

हातून त्या वयांत कांहीं विशेष झाले नाहीं, किंवा तिच्या जवळच्या लोकांस तें