पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कै.सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी.  १९

_________________________________________________________

आहे हें नीट समजून घेऊन त्याप्रमाणें जो वागतो व उपदेशाची सार्थकता

करतो तोच सच्छिष्यकोटींत गणला पाहिजे. समर्थांच्या उपदेशाची दिशा

व हृद्य हीं रामदासी संप्रदायवाल्या शिष्यमंडळीपैकी फार थोड्यांना कळली

असावी, असे त्या शिष्यमंडळीच्या आचरणावरून दिसतें. शिवाजी, थोरले बाजीराव

वगैरे ज्यांच्याठाईत्यांचा उपदेश पूर्णपणें बिंबला ते तर सर्वतोमुखी त्यांचे सच्छिष्य

ह्मणून झटले जात आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रांत कांही पुरुष समर्थांचे सच्छि-

ध्य झाले व आज आहेत, त्यांप्रमाणे सच्छिष्या ह्मणण्यास योग्य अशी आनंदी-

बाईवांचून दुसरी बाई आह्मांस आढळली नाही व पूर्वी झाली असल्यास

आह्मांस माहित नाहीं. ह्मणूनच आमच्या मती महाराष्ट्रांत तीच समर्थांची

एकटी सच्छिश्या होय. कारण समर्थांच्या वर उतरून घेतलेल्या उपदेशाचें

खरें हृद्य तिलाच कळलें, व तिनें आपल्या आचरणानें उपदेशसार्थक्य केलें,

व ती आपण कृतार्थ झाली.

 आतां असा प्रश्न सहज निघेल की, आनंदीबाई जोशी ही बाई तर ज्यांस

हल्ह्रीं 'सुधारलेले' असे निंदाद्योतक विशेषण लावतात त्या वर्गातील स्त्री होती;

तर मग ती गुरु करण्याच्या नादांत कशी पडली ? व विशेषतः समर्थासारख्या

जुन्यापुराण्या गुरूच्या उपदेशाकडे तिच्या मनाची कशी प्रवृत्ति झाली असावी ?

तर त्यावर आमचें इतक्रेंच ह्मणणे आहे कीं, जे सुधारक लोकांवर निंदेचा इतका

भडिमार करतात ते विषय पुरता समजून न घेतां तोंडास येईल तें व मनास

मानेल तें बोलतात. ' जनाननेकः करमर्पयिष्यति' असे समजून स्वस्थ बसण्या-

खेरीज अशा लोकांपुढे दुसरा इलाज नाहीं. जर ते निंदक लोक नि:पक्षपातबुद्धीनें

सुधारक लोक व त्यांची आचरणे पाहतील तर त्यांच्या संबंधाने त्यांस वरीलसारखे

कुतर्क काढण्यास अवसरच सांपडणार नाही. प्रस्तुत प्रश्नासंबंधापुरता जरी विचार

केला तरी असे आढळेल की, बहुतेक सुधारक मंडळीस गुरुमहिमा, गुरुभक्ति, गुरु-

दीक्षा व गुरुपूजा ही सर्व प्रकरणे माहित आहेत, व त्या बहुतेक लोकांनी गुरु केलेला

आहे. मात्र जुना विधि नसून नवीन प्रकारच। विधि त्यांच्यांत आढळतो.

'नवविधान ' ह्मणून जी ब्राह्मधर्माची नूतन ब्रह्मानंद केशवस्वामींनीं

स्थापित केली आहे तींत तर गुरुपूजादि प्रकार जुन्या धर्तीवर होऊं लागला

होता. तेव्हां आनंदीबाई जरी सुधारलेल्या कोटींतील होती तरी तिनें समर्थांचा