पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८   चार चरित्रात्मक लेख.  

स्त्रिया बहुधा अज्ञान व ह्मणूनच फार श्रद्धालु असल्याकारणानें त्यांच्यांत तर

गुरु करण्याचें वेड अत्यंत पसरलेले दृष्टीस पडते. या हिंदुस्थानांतील कांहीं

कांही प्रांतांत हैं गुरु करण्याचें वेड इतकें माजलें आहे कीं, तिकडे बहुतेक

पुरुष आणि बहुधा सर्वच स्त्रिया हीं गुरुपदेश घेतलेली आढळतील. आषाढ

शुद्ध पूर्णिमा हा गुरुपूजेचा दिवस मानलेला आहे. त्या दिवशीं गुरुपूजेकरितां

तिकडे प्रत्येक घरांतील सर्व स्त्रिया - मग त्या सधवा असोत किंवा विधवा असोत-

गुरुगृही जात असतात, व ज्या गांवांत शिष्यसमुदाय सधन व पुष्कळ आहे

अशा गांवीं प्रतिवर्षी गुरुमहाराजांची स्वारी पूजाग्रहणार्थं येत असते. असा

प्रकार जर सर्व हिंदुस्थानभर आहे. तर समर्थास समाधिस्थ झाल्यास आज

दोनशे वर्षे होऊन गेलीं असून इतक्या काळांत आनंदीबाईसारखी समर्थांची

सच्छिष्या कोणी झाली नाही असें जें आमचें ह्मणणे आहे त्याचा आह्मी निर्वाह

कसा करितों ? तर याचे उत्तर इतकेंच कीं, रामदाससंप्रदाय ह्मणून जो

महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहे त्या संप्रदायाच्या शिष्यिणी पुष्कळ आहेत. कांहीं

विधवा शिष्यिणी भगवी छाटी पांघरून आपण रामदासी बाण्याच्या आहोत

असें वेषावरूनही दाखवीत असतात. स्वामींच्या हयातीत त्यांच्याजवळ सज्जन-

गडी आकाबाई व वेणूताई ह्मणून दोघी शिष्यिणी खास स्वामींच्या मठांत राहत

होत्या ही गोष्ट आमच्या स्मरणांत आहे. रामदासनवमीचे (ह्मणजे माघ वद्य

नवमीचे ) दिवशीं सज्जनगडास प्रसादाकरितां हजारो शिष्य व शिष्यिणी गोळा

होत असतात. याहीपेक्षां आणखी एक विशेष प्रकारची समर्थांची शिष्यण

आह्मी पाहिली आहे. एक पंढरपुराकडील देशस्थ ब्राह्मणाची १५/१६ वर्षीची

मुलगी पुरुषवेष धारण करून खांद्यावर कावड घेऊन तीर्थयात्रा करीत असते.

ती रामदासी आहे, ह्मणजे सज्जनगड येथील समर्थांच्या समाधीश तिचा

विवाह झाला आहे, असे तिने सांगितले. समर्थ वडील मंडळीचें मन मोडून

सावधान ह्मणण्याच्या वेळेस पळून गेले व यावज्जीव तर ब्रह्मचर्यानें राहिले.

पण त्यांच्या शिष्यांनीं व शिष्यिणींनीं त्यांस विवाहित्वाचा टिक्का लावण्याकरितां -

व जणूं त्यांचा प्रतिज्ञाभंग करण्याकरितां कीं काय - त्यांच्या समाधीशीं मुलींचें

लग्न लावण्याची अपूर्व शक्कल काढली आहे! तर अशा प्रकारच्या शिष्यांस व शि

ष्यिणींस आमच्यानें सच्छिष्यकोटींत गणवत नाही. त्यांस एका अर्थी गुरुद्रोही

म्हटल्यास वावगे होणार नाही. आपल्या गुरूच्या उपदेशाचें खरें हृद्य काय