पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कृष्णशास्त्री चिपळूणकर.    १३

_______________________________________________________________

पंतांना हवा तितका वेळ होता, परंतु शास्त्रीबोवांना तितकी फुरसतही नव्हती.

पंतांची बुद्धि विशाळ हें तर सर्वमान्यच आहे, परंतु त्याहूनही कृष्णशाख्यांची

कितीपट विशाल ह्मणावी याचें अनुमान करणे कठिण आहे. आमचे लोक खरो-

खर अरसिक यांत शंका नाहीं. आजवरही यांचे बुद्धिवैभवाची गोष्ट लोकविश्रुत

नसावी व ज्ञानप्रकाशाने देखील या अपूर्व प्रसंगाचा उल्लेख करूं नये हें आमच्या

लोकांच्या अरसिकत्वाचें निदर्शक होय. हा प्रकार जर इंग्लंडसारख्या सुधारलेल्या

देशांत झाला असता, तर शास्त्रीबोवांचे किर्तीस पारावार न उरता, आणि अशा

प्रसंगी तिकडील गुणग्राही लोकांस शास्त्रीबोवासारख्या पुरुषास कोठें ठेवूं, कोठें नाहीं,

असें झालें असतें. इंग्लंडांतील राजाश्रित कवि टेनिसन् यांनी कोठें दहापांच

पद्ये एकाद्या मासिक पुस्तकांत छापण्यास दिली तर त्यांस हजारों रुपये मिळ

तात, असे आपण पुष्कळ वेळां वाचलें आहे. परंतु कृष्णशास्त्री यांनी असा

चमत्कार केला तरी त्याची आह्मांला दादही नसावी हें खरोखर भूषणावह नव्हे!

असो. विशेष लिहिणें इष्ट नाहीं; कारण त्यांत आमचेंच मौर्यवर्णन करणें आहे.

 आतां इतकीच सूचना आहे की, ज्ञानप्रकाशकार किंवा त्यांच्यासारख्या दुसऱ्या

कोणी विद्वानाने शास्त्रीबोवांचे आजवर प्रसिद्ध झालेले सर्व लेख एकत्र करून

छापवावे, ह्मणजे त्यायोगें त्यांचे लोकांवर उपकार होतील.

आतां शास्त्रीबोवा जरी शीघ्रकवि होते, तरी त्यांना आपले योग्यतेचा

भरंवसा नसे. त्यांनी आपली ' पद्यरत्नावली' प्रसिद्ध करण्यापूर्वी आपले इष्ट-

मित्रांकडे तिची प्रत पाठवून तिजविषयीं त्यांचे अभिप्राय मागितले होते असें

ऐकतों. जेव्हां लोकांपुढे ठेवण्यालायक ही कविता आहे असें शास्त्रीबोवांचे इष्ट.

मित्रांचें मत मिळाले तेव्हां त्यांनी ती पद्यावली प्रसिद्ध केली. थोरांचें सर्व कांहीं

थोर यांत संदेह नाहीं. कालिदासासारख्यांना देखील स्वतःचे बुद्धीचा विश्वास

नसे. ' बलवदपि शिक्षितानामात्मन्यप्रत्ययं चेतः' ठीकच. उथळ पाण्याला खळ-

खळ फार असते. खोल पाणी संथ वाहतें यांत नवल मानण्यास जागा नाहीं.

तेव्हां स्वत:चे बुद्धीविषयीं शंका यावी हें शास्त्रीबोवांच्या थोरपणाचें लक्षण होय.

 शास्त्रीबोवांचें लोकसमूहाचे हिताकडे चांगलें लक्ष असे. लहानापासून थोरां-

पर्यंत ह्यांस सर्व मंडळी चाहत असत. यांचें मत बहुतेक सर्व सामाजिक कामांत

घेत असत. यांस दुरभिमान बिलकुल नसे.