पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१४    चार चारित्रात्मक लेख

 कृष्णशास्त्री निःसीम मातृभक्त होते. ते एवढ्या योग्यतेस चढले होते, तरी

आपल्या आईशी शेवटपर्यंत एकाद्या अगदी लहान मुलाप्रमाणे वागत. त्यांनीं

आपल्या मातुश्रीची अवज्ञा ही कधीं केलीच नाहीं. आपल्या आईची आज्ञा

मानणें हें आपले कर्तव्यकर्म अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते समजत, आणि

त्याप्रमाणे वागत. त्यांस काळजाच्या रोगाची व्याधि तीन चार वर्षांपासून होती.

तिजपासून त्यांस इजा होऊं लागे तेव्हां स्वतःच्या मरणाचें भय, त्यांस आईच्या

संबंधानें, फार वाटे. ती त्यांची आई एक दोन वर्षांपूर्वी निवर्तली, त्या वेळी

चिपळूणकर आपल्या एका आप्तापाशी बोलले कीं, 'आतां आमची तयारी आहे.'

ही गोष्ट आह्मांस आमच्या एका पुणेकर मित्राने सांगितली.

 लहानाचे मोठे होणे, विद्याभ्यास करणें, लहान पायरीपासून हळू हळू मोठ्या

योग्यतेस चढणें, सर्व प्रकारच्या सभांमध्ये अध्यक्ष होणें, आपल्या बोलण्याकडे

सर्व महाराष्ट्रभाषी लोकांचें चित्त ओढून घेणें, आणि उत्तम वक्ता ह्मणून वाहवा

मिळविणें, इतक्या गोष्टी शास्त्रीबुवांनीं पुण्यग्रामीं करून शेवटी देह तेथेंच ठेविला.

असे पुरुष वारंवार निपजावयाचे नाहींत.

 विलक्षण बुद्धि ही शास्त्रीबुवांस परमेश्वराची अप्रतिम देणगी होती. ते मोठे

जबरे वाचणारे होते. आमच्या ऐकिवांत असे आहे कीं, ते दररोज निदान

मोठ्या पुस्तकाची शें दोनशे पत्र वाचीत असत. त्यांची स्मरणशक्ति अनुपम

होती. कोणत्याही विषयावर ते बोलू लागले ह्मणजे त्यांस दृष्टांत असे भराभर

सुचत कीं, तो विषय ऐकणाऱ्यांच्या मनांत भरण्यास मुळींच उशीर लागत

नसे.

 कृष्णशास्त्री निस्पृह होते. दुसऱ्याचे मर्जीखातर, आपले खरे अभिप्राय एकीकडे

ठेवून, प्रसंग पाहून बोलणें, हे त्यांस मुळींच ठाऊक नव्हते. परंतु, हें जग

पडलें लुडबुड्यांचें. ह्मणून ते सरकारी नौकरीमध्ये आपल्या योग्यतेप्रमाणे मह-

त्पद पावले नाहीत.

 सत्यप्रीति आणि परोपकारबुद्धि हे गुण शास्त्रीबुवांचे ठायीं उत्तम प्रकारें

चसत होते. वादांत कोणी त्यांचा असो की परका असो, त्यांनी नेहमी आपला

खराखरा अभिप्राय द्यावा, आणि होईल तितकें दुसऱ्याला साह्य करावें,

हे त्यांचें ब्रीद होतें.