पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२  चार चरित्रात्मक लेख.

__________________________________________________________

ळांचा आशाभंग केला असे ह्मणणे भाग पडतें. आतां भाषांतररूपानें का होईनात

जर सात आठ ग्रंथ लोकांस शास्त्रीबोवांनी सादर केले तर लोकांनी तेवढ्यांतच संतोष

मानावा असे कित्येक ह्मणतील. परंतु दात्याचे ऐपतीच्या प्रमाणानें याचकांची उडी व

आशा, हें तत्त्व व्यवहारसंमत आहे. त्याचप्रमाणे शास्त्रीबोवांचे लोकोत्तर बुद्धि-

वैभवावरून त्यांजकडून व्याकरण, न्यायशास्त्र, मानसशास्त्र, व अर्थशास्त्र ह्या किंवा

अशासारख्या दुसऱ्यास सहसा व सहज न झेंपणाऱ्या विषयांवर स्वतंत्र ग्रंथ

होतील अशी आशा लोकांची होती, ती सकारण आहे असे कोणीही कबूल

करील. आतां शास्त्रीबोवांचे लेखांमुळे मराठी भाषेस वरीच ऊर्जित कळा आली

हे प्रत्येकास प्रांजलपणे कबूल केले पाहिजे. परंतु एवढ्यावरून शास्त्रीबोवा ऋण

मुक्त झाले असें मात्र ह्मणवत नाहीं. परंतु आतां या ह्मणण्याचा काय उपयोग?

तेव्हां ज्या कोणास ह्यावरून सद्बोध ग्रहण करण्याचा असेल त्यांनीं विलंब न

लावतां उद्योगास लागावे. कारण काळाचा बडगा कोणावर केव्हां पडेल याचा

नियम नाहीं. प्रत्येकानें आपापल्या शक्त्यनुसार ऋणत्रयांतून मुक्त होण्यास झटावें

एवढे येथें सुचविणें पुरे आहे.


 शास्त्रीबोवा हे कवि होते हैं त्यांचे ' पद्यरत्नावली' वरून सर्वोस विश्रुत असे-

लच. यांची कवित्वशक्तीचे संबंधानेही लोकोत्तरबुद्धि होती, असें अरुणोदय-

कारांनी " वृक्ष आणि पक्षी यांचा संवाद " या लहानशा शतपद्यात्मक काव्या-

विषयीं जी गोष्ट लिहिली आहे, तिजवरून पूर्ण खात्री होते. ज्ञानप्रकाशाचे माल-

कांनीं खिळ्यावर तें पत्र काढण्याचा विचार करून खिळे वगैरे सामान आणविलें.

परंतु अक्षरांखालीं व वर लागणारी कांहीं चिन्हें-उ, ऊ, ॠ, ऋ, ए, ऐ इ०-

आली नव्हती. याच सुमारास एक चांगला मुहूर्त आला. त्यावर कारखाना सुरू

करावा असे सर्वांचे विचारानें ठरले. परंतु सदरीं सांगितलेली चिन्हें हातीं

नसल्या कारणानें कांहीं मजकूर छापण्याचा इलाज नव्हता. तेव्हां या निर्दिष्ट

चिन्हांची ज्यांत आवश्यकता लागणार नाहीं असा कांहीं मजकूर शास्त्रीबोवांनी

लिहून द्यावा असा सर्वोचा आग्रह पडल्यावरून त्यांनी पूर्वनिर्दिष्ट विषयावर

एका तासांत १०० पद्दे करून दिलीं, व ज्ञानप्रकाशाचे मालकांचा हेतु तडीस

नेला. आतां या अलौकिक बुद्धीची तारीफ तरी किती करावी ! निरोष्ट, लघ्व-

क्षरी रामायणें पंतांनी रचलीं याबद्दल त्यांची वर्णना त्यांचे भक्त गाताहेत. परंतु