पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कृष्णशास्त्री चिपळूणकर.    ११

नवल वाटतें. हे नीलकंठशास्त्री पुनः थोड्या दिवसांपूर्वी पुण्यास आले होते.

परंतु पुन: कोणाशीही त्यांचा वादप्रसंग घडल्याचें ऐकिवांत नाहीं. प्रस्तुत हे

मध्य प्रांतांत पालक आहेत. असो. या गोष्टींवरून कृष्णशास्त्री यांची सयुक्तिक

कोटिक्रम करून प्रतिपक्ष्याचा मोड करण्याची शैली वर्णनीय होती असे निर्वि

वाद सिद्ध होतें.

 मराठी भाषेला शास्त्रीबोवांनी नांवारूपास आणण्याकरितां फार प्रयत्न केले.

ज्ञानप्रकाश' व 'शाळापत्रक' यांचे द्वारे मराठी भाषेत अनेक विषयांचें उद्-

घटन करून लोकांना आपले अमोलिक विद्वत्तेचा त्यांनी लाभ करून दिला. त्यां

शिवाय त्यांनी संस्कृत व इंग्रेजी ग्रंथांची भाषांतरें करून शुद्ध मराठी भाषा कशी

लिहावी, याचें चांगले वळण लावून दिलें. शास्त्रीबोवांची सरळ, सुगम, मार्मिक

व शुद्ध लिहिण्याची सरणी खरोखर अनुकरणार्ह आहे. विषयानुरूप भाषा बोलतां

येऊन पुनः ती समजण्यास कठिण वाटू नये असे लिहिणें किती कठिण आहे हें

सांगणें नलगे. परंतु शास्त्रीबोवांनीं ह्मणून जे जे विषय हाती घेतले, त्यांना साजेल

व वाचकांस तर नडणार नाही अशीच भाषेची सरणी ठेविली आहे. यामुळे

शास्त्रीबोवांचे ग्रंथ सर्वत्र प्रिय झाले आहेत. शास्त्रीबोवांचे सात आठ ग्रंथ आज

प्रसिद्ध आहेत, परंतु हे सर्व भाषांतररूप आहेत. त्यांनी स्वतंत्र ह्मणून एकही

ग्रंथ लिहिला नाहीं. आतां शास्त्रीबोवांसारख्या विशाल बुद्धीच्या गाड्या विद्वा-

नानें स्वतःचे बुद्धीचें व विचारांचें फळ हाणून स्वतंत्र ग्रंथ लिहिणें अवश्य होतें.

परंतु त्यांनी तसल्या प्रकारचा यत्न केल्याचे ऐकिवांत नाहीं. स्वतंत्र ग्रंथ लिहि

ण्यास शास्त्र विवांस जितकी अनुकूलता होती तितकी दुसऱ्यास मिळणे फार

कठिण आहे. कारण शास्त्रीबोवांसारखी बुद्धीच फार थोड्यांस आहे. तशांतून

शास्त्रीबोवांप्रमाणे उत्कृष्ट गुरूंजवळ गहन विषयांचें अध्ययन करण्यास मिळणे

कठिण. या सर्वांत ज्या भाषेंत ग्रंथ लिहावयाचे त्या भाषेचें पूर्ण मार्मिक ज्ञान

व जेथें त्या भाषेचें उत्कृष्ट स्वरूप सदोदित ढळढळीत दृष्टीस पडतें अशा

ठिकाणी राहणें, इत्यादि सामुग्री सिद्ध असतां शास्त्रीबोवांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिले

नाहीत याचें इंगित कळत नाहीं. कदाचित् त्यांनी तसे ग्रंथ लिहिले असून

आपले मरणोत्तर प्रसिद्ध व्हावे अशा संकेताने ते गुप्त ठेविले असतील, तर आ

मचें कांही ह्मणणें नाहीं. परंतु तसा जर प्रकार नसेल तर शास्त्रीबोवांनी पुष्क