पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०   चार चरित्रात्मक लेख.

थोडीशी माहिती आहे ती दिली असतां फारशी अप्रासंगिक होणार नाहीं असें

वाटतें. कारण त्या योगे शास्त्रीबोवांचे प्रतिपक्ष्याची खरी योग्यता कळेल व शा-

स्त्रीबोवांना वादांत जें यश मिळाले ते किती योग्यतेचें होतें याची चांगली कल्पना

करितां येईल.

 शास्त्रीबोवांचे प्रतिपक्षी हे काशीचे राहणार. यांचें नांव पूर्वाश्रमसां-

प्रदायाप्रमाणे वे० शा० सं० नीलकंठशास्त्री गोरे यांनी प्रथमतः थोडेसें वेदाध्य-

यन करून नंतर व्याकरण व न्याय अशा दोन शास्त्रांचा अभ्यास केला. अभ्यास

चालला असतां ख्रिस्ती धर्मखंडनाकडे यांचे मन वळले. याला कारण रस्त्यांत

उभे राहून उपदेश करणारे ख्रिस्तभक्त झाले. त्यांच्या चालीप्रमाणे ते हिंदुधर्मा -

विरुद्ध अद्वातद्वा हवें तसे बोलत. तें नीलकंठशाली व त्यांचे सहाध्यायी यांस

न रुचल्यामुळे त्यांनी हिंदुधर्ममंडन व ख्रिस्ती धर्मखंडन यांविषयीं तोंडी व लेखी

वादविवाद सुरू केला. त्या संबंधानें त्यांनी संस्कृतांत व हिंदी पुस्तकें लिहिली

होतीं, व तीं छापून प्रसिद्धही झाली होती. पुष्कळ वेळां ख्रिस्तभक्तांचें शास्त्री मज-

कूर याणीं खंडन केलें. ख्रिस्ती शास्त्राचें चांगले पर्यालोचन केल्याविना ख्रिस्तभक्तांचे

दांत त्यांच्याच घशांत घालतां येत नाहीत, असें गोरे शास्त्री यांस वाटून त्यांनीं तें

शास्त्र वाचण्याचें सुरू केलें. याच सुमारास इंग्रेजी भाषा शिकावी अशावि-

षयीं त्यांची प्रवृत्ति झाली. बायबल वाचणे त्या उद्देशास चांगले साहाय्यक झालें.

खंडन करण्याचे उद्देशानें जरी ते बायबल वाचूं लागले तथापि कांही काळानें,

पवित्र आत्म्या' नें त्यांजवर झडप घातली. हिंदु धर्मावरची त्यांची श्रद्धा उ

डाली. खिस्तावांचून त्यांस अन्य तरणोपाय दिसेना. कदाचित् असच्छाबावलो-

कनानें बुद्धिभ्रंश झाला असेल असें मनाला वाटून त्यांनी चंडीपाठ वगैरे

अनुष्ठानें सुरू केली. परंतु त्यांमुळे मन ताळ्यावर न येतां अधिकच भकलें. तेव्हां

ख्रिस्ती धर्माचे सत्यतेची पूर्ण साक्ष मनाला पटून पूर्ण विचारान्तीं आपले वयाचे

पंचविसावे वर्षी त्यांनीं खिस्तीधर्मदीक्षावलंब केला. तेव्हांपासून त्यांचें पूर्वाश्रमां-

तील नांव रद्द होऊन प्रस्तुत धर्मानुकूल असें' रेव्हरेंड निहिमाया गोरे' हें

नांव त्यांनीं धारण केले आहे. या काशीकर पंडिताच्या त्रोटक माहितीवरून कृष्ण-

शास्त्रीबोवांस ज्या प्रतिपक्ष्याशी झुंजावयाचें होतें तें फार जाडें प्रकरण होतें असें

वाटल्यावांचून राहणार नाहीं. खिस्ताच्या कळपांत हैं धेंड कसें सांपडलें याचें