पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कृष्णशास्त्री चिपळूणकर.  

णांनीं असें सयुक्तिक मंडन करीत कीं, प्रतिपक्षाला त्यांचें ह्मणणें मुकाट्यानें

मान्य करण्यापेक्षां दुसरी तोड उरत नसे. पुण्यांत कसलीही सभा होवो, तींत

शास्त्रीवोवांकडे अध्यक्षत्व नाहीं, असें बहुधा होत नसे. याचे कारण शास्त्रीबोवांचें

वक्तृत्व, त्यांची विद्वत्ता व विषयप्रतिपादनाची शैली हीं होत. त्यांजवळ विषय-

प्रतिपादनाला आवश्यक अशी इतकी निवडक माहिती असे कीं, दोन चार

घटका जरी ते बोलत असले तरी पुंजी संपली असे होत नसे. शास्त्रीबोवांचें

बोलणें जितकें विद्वन्मंडळाला प्रिय होत असे, तसें इतरांना प्रिय होत नसे.

 शास्त्रीबोवांचे व्याख्यानादिकांपासून पुण्यग्रामस्थ लोकांस विशेष फायदा

हा झाला कीं, पुष्कळ हूड, अविचारी, स्वैर अशी मुलें बाटण्याचे रंगांत

होती, त्यांचे मनावरचा तो परधर्मावलंबनाचा ग्रह नष्ट होऊन तीं

ताळ्यावर आली, असा पुष्कळांचा ग्रह आहे. बंडाचे पूर्वी बाटण्याचें खूळ फार

माजलें होतें तें मोडून टाकवेल तितकें टाकावें, अशा विषयींचा प्रयत्न पुणे येथें

चालला होता व त्यांत शास्त्रीबोवांचेंही अंग होतें. त्या प्रयत्नाचेंच फळ ' विचा-

रलहरी ' ही होय. शास्त्रीबोवांनी ख्रिस्ती धर्माचे खंडणार्थ वाद केल्याचे पुष्क

ळांचे स्मरणांत असेल. हलके सलके जे क्षुल्लक लाभवश झालेले ख्रिस्ताचे भक्त

यांची शास्त्रीबोवांचे पुढे गाळण उडे यांत कांहीं नवल नाहीं. परंतु ज्यांनी विचा

राच्या कसास लावून व बारीक छानी करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता

त्यांस शास्त्रीबोवांनी निरुत्तर करून तोंड खाली घालावयाला लावून त्यांची बोळवण

केली असे अनेक प्रसंगी झाल्याचें ऐकिवांत आहे. त्यांतील एका प्रसंगाविषयीं असें

सांगतात की, ख्रिस्ती धर्म स्वीकारिलेले एक काशीकर पंडित पुणे येथें गेले होते.

त्यांनीं तेथें स्वीकृतधर्मनियमाप्रमाणे उपदेशविधि सुरू केला. कृष्णशास्त्री व हे

काशीकर यांचा एके प्रसंगी वाद जुंपला. दोघेही योद्धे जबर, काशीकर ह्मणजे

लहान सहान असामी नव्हते. दोघेही इंग्रजी व संस्कृत नैयायिक. ह्या वेळीं

शास्त्रीवांचें बुद्धिवर्चस्व दृष्टीस पडलें. दोघांचाही कोटिक्रम चालतां चालतां,

काशीकर पंडित हतवीर्य झाले, व अपयशाचें गाठोडे घेऊन परत गेले. या प्र

संगी शास्त्रीबोवांना जे यश मिळाले तें त्यांच्या सत्यपक्षपातामुळे व बुद्धिवैभवा-

मुळे मिळाले यांत संशय नाहीं; कारण काशीकर ख्रिस्ती पंडित कांही सामान्य

व्यक्ति नव्हती. ते मोठे विद्वान्, मार्मिक, व शोधक होते. त्यांजविषयी आह्मांस जी